शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करा

By admin | Updated: May 22, 2016 00:40 IST

औरंगाबाद : शहरातील धार्मिक स्थळांच्या प्रकरणांत महापालिका चालढकल पद्धतीने काम करीत आहे.

औरंगाबाद : शहरातील धार्मिक स्थळांच्या प्रकरणांत महापालिका चालढकल पद्धतीने काम करीत आहे. अनधिकृत धार्मिक स्थळांच्या बाबतीत मनपा प्रशासनाने कडक कारवाई न केल्यास थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे निर्देश यापूर्वीच शासनाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाने दिलेल्या सूचनेनुसार महानगरपालिकेने धार्मिक स्थळांचे सर्वेक्षणही केले. नंतर हे सर्वेक्षण वादात सापडले. मनपा प्रशासनाने सरसकट धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करून यादी प्रसिद्ध केली. यामध्ये मान्यताप्राप्त अनेक धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या यादीवर सर्वधर्मीय नागरिकांनी मनपाच्या यादीवर आक्षेप नोंदविला होता. नागरिकांचा रोष वाढू लागल्याने महापौर त्र्यंबक तुपे यांनी धार्मिक स्थळांचे नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मनपा प्रशासनाने सविस्तर सर्वेक्षण करून अहवाल आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांना सादर केला. दरम्यान, अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई होत नसल्यामुळे न्यायालयाने शासनावर ताशेरे ओढले होते. त्यामुळे शासनाने २०११ नंतरची बेकायदा धार्मिक स्थळे हटविण्यासाठी कृती कार्यक्रम तयार करून तातडीने कारवाई सुरूकरावी, असे आदेश दिले होते. मात्र, अद्याप शहरात कारवाई सुरू झालेली नाही. असे असतानाच शासनाने नव्याने आदेश देऊन शिस्तभंगाची कारवाई करावी, असे शासनाने मनपाला दिलेल्या आदेशात म्हटले आहे.