अंबाजोगाई : भाऊबीजेला बहिणीला साडी-चोळी, दागिने ओवाळणी म्हणून देण्याची प्रथा आहे. मात्र, कोपरा (ता. अंबाजोगाई) येथे एका शिक्षकाने गरज ओळखून बहिणीला शौचालय बांधून देत अनोखी भेट दिली.जि.प. चे सीईओ नामदेव ननावरे यांच्या संकल्पनेतून ‘नातं जबाबदारीचं’ हा उपक्रम सुरू असून त्या अंतर्गत शौचालय मोहीम गतिमान करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोदरी येथील जि. प. शाळेवर कार्यरत शिक्षक राजेसाहेब किर्दत यांनी बहीण रंजना देशमुख (रा. कोपरा) यांना शौचालय बांधून दिले. स्वच्छता हा महत्त्वाचा विषय असून, दागदागिने व कपड्यापेक्षा आरोग्याची काळजी करणे गरजेचे आहे. त्यामुळेच आपण बहिणीला शौचालय बांधून दिल्याची प्रतिक्रिया किर्दत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (वार्ताहर)
ओवाळणीच्या रुपात दिले शौचालय बांधून
By admin | Updated: October 31, 2016 00:03 IST