शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

तहसीलदारांचे दौरे स्वखर्चातून

By admin | Updated: July 14, 2015 00:50 IST

संजय कुलकर्णी, जालना गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील सात तहसीलदारांची शासकीय वाहने जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली. परंतु या काळात नवीन वाहन

संजय कुलकर्णी, जालना गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील सात तहसीलदारांची शासकीय वाहने जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली. परंतु या काळात नवीन वाहन तर सोडाच परंतु जुने खाजगी वाहन वापरण्यासाठी देखील प्रशासनाने अद्याप मंजुरी दिलेली नाही. त्याचप्रमाणे आतापर्यंत डिजेलसाठी खर्चाची तरतुदही केली नसल्याने या तहसीलदारांवर वैयक्तिक खर्चातूनच वाहने वापरण्याची वेळ आली आहे. जालना तालुक्याच्या तहसीलदारांचे वाहन वगळता जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा, भोकरदन, जाफराबाद व बदनापूर या तालुक्यातील तहसीलदारांकडील वाहने कालबाह्य झाली, नवीन वाहन खरेदीसाठी जुनी वाहने जमा करण्याचे आदेश देत जिल्हा प्रशासनाने आॅगस्ट २०१४ पासून एकापाठोपाठ सातही तहसीलदारांची शासकीय वाहने ताब्यात घेतली. या वाहनांचे निर्लेखनही करण्यात आले. परंतु नवीन वाहन मिळेना, आणि सरकारी कामांच्या वापरासाठी खाजगी वाहने किरायाने घेण्याचे आदेशही मिळेना. एवढेच नव्हे तर सध्या तहसीलदार ज्या खाजगी वाहनांचा वापर करतात, त्यांच्या डिझेलचा किंवा किरायाचा खर्च मंजूर होणार का, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात सध्या दुष्काळी वातावरण आहे. जूनमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. परंतु गेल्या तीन आठवड्यांपासून पाऊस गायब असल्याने दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात दुष्काळी दौरे, महसूलच्या कामांचा आढावा, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील बैठका इत्यादींसाठी जिल्ह्यातील तहसीलदारांना सतत वाहनांचा वापर करावा लागत आहे. या वाहन वापरासाठी खर्चाची कुठलीही तरतूद नसल्याने सध्यातरी या खर्चाचा भूर्दंड तहसीलदांनाच सहन करावा लागत आहे. एका तहसीलदारांनी दिलेल्या माहितीनुसार खाजगी वाहन वापरण्यासाठी दरमहा हजारो रूपयांचा खर्च येत आहे. हा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न आमच्यासमोर आहे. कारण या खर्चास प्रशासकीय पातळीवर कसलीही मंजुरी नाही. किंवा डिझेल खर्च मिळणार, असेही सांगण्यात आलेले नाही. याउलट दुष्काळी व नापिकी परिस्थितीमुळे वारंवार विविध ठिकाणी होणाऱ्या बैठकांना आम्हाला जावे लागते. जिल्ह्यात ज्या तहसीलदारांची शासकीय वाहने जमा करण्यात आली, त्यांना नवीन वाहने खरेदीचा प्रस्ताव मंत्रालयात महसूल प्रशासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. ‘सेतू’ अंतर्गत जमा असलेल्या रक्कमेतून या तहसीलदारांना मार्च २०१५ पर्यंतच्या डिझेल व वाहन किरायाचा खर्च देण्यात आलेला आहे. एप्रिल ते जून २०१५ या तीन महिन्यांचा खर्चही लवकरच देण्यात येणार आहे. तहसीलदारांच्या जुन्या वाहनांचे निर्लेखन करण्यात आलेले आहे. - राजेश इतवारे, निवासी उपजिल्हाधिकारी, जालना याबाबत अंबडचे तहसीलदार महेश सावंत यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, सप्टेंबर २०१४ पासून या तहसील कार्यालयाचे वाहन जमा करण्यात आले आहे. सध्या आपण खाजगी वाहनाचा वापर करीत असून त्याच्या डिझेलचा खर्चही प्रशासनाकडून मिळालेला नाही. ४बदनापूरचे तहसीलदार बालाजी क्षीरसागर म्हणाले, खाजगी वाहनाचा वापर आम्ही करतो, त्याविषयी जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी वगैरे मिळालेली नाही. भोकरदनचे तहसीलदार डोळस म्हणाले, मी एप्रिल २०१५ मध्ये तहसीलदार पदाची सुत्रे स्वीकारलेली आहेत. तेव्हापासून आपण खाजगी वाहनाचाच वापर करतो.