शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

तडेगाव, नळणी पूर्णा नदी पात्रातून वाळूचा बेसुमार उपसा

By admin | Updated: May 13, 2017 00:34 IST

केदारखेडा : येथून जवळच असलेल्या भोकरदन तालुक्यातील तडेगाव व नळणी परिसरातील पूर्णा नदीच्या पात्रातून भरदिवसा जेसीबी यंत्राच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरु आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककेदारखेडा : येथून जवळच असलेल्या भोकरदन तालुक्यातील तडेगाव व नळणी परिसरातील पूर्णा नदीच्या पात्रातून भरदिवसा जेसीबी यंत्राच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरु आहे. त्यासोबतच त्याची बिनधास्त वाहतूक सुरु आहे़याकडे प्रशासनाच्या सर्वच कर्मचारी व अधिकाऱ्यांचे जाणून बुजून दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे़ येथील नदीपात्रात शासनाने काही वाळू उपसा करण्यासाठी या वाळू माफियांना परवानगीच दिल्याची जाणीव होऊ लागली आहे़ बेसुमार वाळूचा उपसा होत असल्याने नदीपात्राला धोका निर्माण झाला आले. अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी परिसरताील युवकांनी पुढाकार घेतला आहे. नदी पात्रात जेसीबीद्वारे वाळूचा उपसा केल्या जात असताना त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासनाचे नेमके पाणी कुठे मुरत आहे़ हे सर्वसामान्यांना कळेनासे झाले आहे़ लिलाव घेणाऱ्या गुत्तेदारास सुध्दा जेसीबीद्वारे वाळू उपसा करण्याचा परवाना नसताना अवैध वाळू करणाऱ्या माफियांना ही परवानगी दिली कोणी हा प्रश्न आहे़ प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे हे नदी पात्र बकाल होत आहे़ या नदी पात्राची मोठ्या प्रमाणात चाळणी होत आहे़ तडेगाव व नळणी परिसरातील ट्रॅक्टर सकाळीच नदी पात्रात दाखल होतात़ याद्वारे वाळू नदी काठावर आणल्यानंतर बुलडाणा, सिल्लोड, औरंगाबाद, जालना, भोकरदन आदी भागातून येणाऱ्या ट्रकमध्ये वाळू भरुन वाहतूक केली जाते. काही ट्रक नदीपात्रात थेट जेसीबी यंत्राने भरल्या जात आहेत. यावर प्रशासनाचा अंकुश नसल्याचे चित्र आहे़ वाळू माफिया व प्रशासनाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांपर्यंत आर्थिक लागेबांधे असल्याची चर्चा ग्रामस्थांतून होत आहे.