शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

तब्बल दोन तास पूजाची मृत्यूशी झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 00:58 IST

नांदेड: रक्ताच्या नात्यातील भावानेच गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडली तरीही रांगत रस्त्यावर येऊन मदतीची याचना करणाºया महिलेची तब्बल दोन तास मृत्यूशी झुंज सुरु होती़

ठळक मुद्देनागरिकांनी तिची मदत करण्याऐवजी मोबाईलवर या दृश्याचे चित्रीकरण करण्यालाच महत्व दिले़ भावानेच गळ्यावर केले़ धारदार शस्त्राने वारमदत मिळाली असती तर किमान तिचा जीव वाचला असता़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: रक्ताच्या नात्यातील भावानेच गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडली तरीही रांगत रस्त्यावर येऊन मदतीची याचना करणाºया महिलेची तब्बल दोन तास मृत्यूशी झुंज सुरु होती़ परंतु संवेदना बोथट झालेल्या नागरिकांनी तिची मदत करण्याऐवजी मोबाईलवर या दृश्याचे चित्रीकरण करण्यालाच महत्व दिले़ बघ्यांची मोठी गर्दी जमली होती़, परंतु महिलेच्या मदतीसाठी कुणीही पुढे आले नाही़ दोन तासानंतर या महिलेची प्राणज्योत मालवली़ या घटनेमुळे संवेदनाहीन समाजाचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले़भोकर येथील नवविवाहिता पूजा हिचे दीड महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते़ लग्नापूर्वी तीन वर्षे तिचे गावातीलच गोविंद कºहाळे याच्यासोबत प्रेमसंबंध होते़ त्यातूनच २२ जुलै रोजी हे प्रेमी युगुल तेलंगणात पळून गेले होते़ ही बाब पूजाचा भाऊ दिगंबर दासरे याला समजल्यानंतर तो त्यांना आणण्यासाठी गेला़ भोकरकडे येत असताना दिगंबरने पूजा आणि गोविंद यांच्यावर कोयत्याने वार केले़ यामध्ये गोविंदचा जागीच मृत्यू झाला़ तर पूजाही मयत झाली असे समजून दिगंबर त्या ठिकाणाहून तडक भोकर ठाण्यात आला़, परंतु इकडे पूजामध्ये जीव होता़रस्त्याच्या शेजारी झुडुपात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पूजा रांगतच रस्त्यावर आली़ रक्तस्त्राव अधिक झाल्याने तिला उठताही येत नव्हते़ रस्त्यावरच मदतीची याचना करीत ती पडली होती़ यावेळी रस्त्यावरुन जाणाºयांनी वाहने थांबविली, परंतु कुणीही तिच्या मदतीसाठी पुढे येत नव्हता़ बघ्यांची गर्दी वाढतच होती़ तशी पूजाही मदतीसाठी सर्व शक्ती एकवटून हाताने इशारे करीत होती़ सर्व जोर लावून एकदाची ती उठून बसली़ यावेळी उपस्थितांनी तिला कुणी मारलं असा प्रश्नही केला? त्या प्रश्नांची उत्तरेही तिने दिली़ परंतु तिला मदत करण्याऐवजी जो-तो आपल्याजवळील मोबाईलमध्ये तिचे चित्रीकरण करण्यात गुंतला होता़ रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने थांबली होती, परंतु यातील एकानेही तिच्या मदतीसाठी हात पुढे केला नाही़ शरीरातील त्राण संपल्यामुळे अखेर पूजाने रस्त्याच्या कडेलाच अखेरचा श्वास घेतला़ त्यानंतर बºयाच उशिराने घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचली़ या सर्व घटनाक्रमात जवळपास दोन तास वेळ गेला़ जिवाच्या आकांताने तडफडणाºया पूजाचा हा अखेरचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब पुढे आली़ पूजाला वेळीच मदत मिळाली असती तर किमान तिचा जीव वाचला असता़ अशी चर्चा होत आहे़