शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
3
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
4
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
5
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
6
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
7
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
8
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
9
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
10
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
11
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
12
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
13
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
14
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
15
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
16
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
17
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
18
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
19
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
20
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल

पाण्यासाठी प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

By admin | Updated: May 23, 2016 23:50 IST

अहमदपूर : अहमदपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही केवळ नियोजनाअभावी शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

अहमदपूर : अहमदपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही केवळ नियोजनाअभावी शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पालिका प्रशासनाच्या कारभाराच्या निषेधार्थ सोमवारी साजीदभाई मित्र मंडळाच्या वतीने नगर परिषदेवर घागर मोर्चा काढून माठ फोडो आंदोलन केले. त्याचबरोबर पालिका प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढली. दुष्काळामुळे लातूर जिल्हा होरपळून निघत आहे. अहमदपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी धरणात मुबलक पाणीसाठा आहे. मात्र पालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी आणि नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहराला ३० ते ३२ दिवसांपासून नळाला पाणी आले नाही. त्यामुळे प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. शहरातील साजीदभाई मित्र मंडळाच्या कार्यालयापासून या आंदोलनास सुरुवात झाली. आझाद चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, जुने बसस्थानक मार्गे हा मोर्चा पालिकेवर धडकला. या मोर्चावेळी प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली होती. पालिका मैदानात आंदोलन करण्यात आले. यावेळी साजिद सय्यद म्हणाले, जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाई असताना अहमदपूर शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी धरणात पुरेसे पाणी आहे. पण नगर परिषद आणि नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे शहरवासीयांना टंचाईस सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने ही पाणीटंचाई दूर करून सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली. (वार्ताहर)