शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

सर्वधर्म समभावाचे प्रतीक क्रांतीचौकातील छत्रपतींचा पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 20:03 IST

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांतीचौकातील अश्वारूढ पुतळा सर्वधर्म समभावाचा प्रतीक मानला जातो. ३५ वर्षांपूर्वी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी सर्व समाजातील नागरिकांनी पुढाकार घेतला होता.

ठळक मुद्देभावी पिढीला स्फूर्ती मिळावी, यासाठी २१ मे १९८३ रोजी क्रांतीचौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला.मागील ३४ वर्षांच्या काळात ज्या काही सामाजिक, राजकीय चळवळी झाल्या, तसेच शहराचा कायापालट झाला त्याचा साक्षीदार महाराजांचा पुतळा ठरला आहे.

औरंगाबाद : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांतीचौकातील अश्वारूढ पुतळा सर्वधर्म समभावाचा प्रतीक मानला जातो. ३५ वर्षांपूर्वी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी सर्व समाजातील नागरिकांनी पुढाकार घेतला होता. त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष तत्कालीन नगराध्यक्ष अलफखाँ हे होते. 

भावी पिढीला स्फूर्ती मिळावी, यासाठी २१ मे १९८३ रोजी क्रांतीचौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. मागील ३४ वर्षांच्या काळात ज्या काही सामाजिक, राजकीय चळवळी झाल्या, तसेच शहराचा कायापालट झाला त्याचा साक्षीदार महाराजांचा पुतळा ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मातील लोकांना समान न्याय्य वागणूक दिली. खर्‍या अर्थाने महाराजांनी त्यावेळी स्वराज्य निर्माण केले. महाराजांचा औरंगाबादेतील पुतळाही सर्वधर्म समभावाचा प्रतीक ठरला आहे. मराठवाड्याच्या राजधानीचे वैभव ठरलेल्या छत्रपतींचा भव्य पुतळा उभारण्याच्या पाठीमागेही शहरवासीयांनी केलेला २१ वर्षांचा पाठपुरावा हा सुद्धा एक इतिहास होय. पुतळा उभारण्यासाठी तेव्हा सर्व धर्मातील नागरिकांनी हातभार लावला होता. सर्व राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पुतळा उभारण्यासाठी एकजूट दाखविली. पुतळ्याची उभारणी १९८३ मध्ये झाली असली तरीही तो उभारण्यासाठी १९६२ पासून प्रयत्न सुरू झाले होते. त्यावेळी शहरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील काही मंडळींनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शहरात पुतळा उभारण्याचा संकल्प केला होता. क्रांतीचौकात पुतळा उभारण्यासाठी व ते कार्य तडीस नेण्यासाठी १९८० पर्यंत या गोष्टींचा पाठपुरावा या मंडळींनी केला. 

या काळात महाराजांचा पुतळा उभारण्याच्या कल्पनेला शहरवासीयांनी तेव्हा जोरदार पाठिंबा दिला होता. त्यावेळी नगरपालिकेने हे कार्य हाती घेऊन पूर्ण करावे यासाठी चोहोबाजूने मागणी केली होती. परिणती म्हणजे १९८१ मध्ये तत्कालीन ग्रामविकासमंत्री बाबूराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीत पुतळा उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे कार्य जिल्हा परिषद व नगरपालिकेने संयुक्तपणे हाती घ्यावे, असे ठरले. नगराध्यक्ष अलफखाँ यांच्या अध्यक्षतेखाली अश्वारूढ शिवछत्रपती सर्वपक्षीय पुतळा समितीची स्थापना करण्यात आली होती. सचिव म्हणून प्रकाश मुगदिया यांंची निवड करण्यात आली होती. तसेच समितीमध्ये केशवराव औताडे, जिल्हा परिषद अध्यक्ष साहेबराव पाटील डोणगावकर, शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, अशोक शहा आदींचा समावेश होता. २१ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर क्रांतीचौकात १९८३ मध्ये अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. 

एकतेचा संदेश राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, सर्व धर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन १९८३ मध्ये महाराजांचा पुतळा क्रांतीचौकात उभारला. यातून शहरवासीयांनी सामाजिक एकता, सलोख्याचा संदेश दिला होता. उल्लेखनीय म्हणजे पुतळा उभारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष तत्कालीन नगराध्यक्ष अलफखाँ हे होते. त्यांना सर्व धर्मातील लोकांनी साथ दिली व शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे स्वप्न साकार झाले. - अशोक शहा, सामाजिक कार्यकर्ते

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी1. मुंबईतील शिल्पकार एस. डी. साठे यांनी छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा तयार केला. 2. शिवरायांचा पुतळा १५ फूट उंच व ५ फूट रुंद.3. मुंबईहून ट्रकने ९ मे १९८३ रोजी शहरात पुतळा आणण्यात आला होता. 4. २१ मे १९८३ रोजी छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८kranti chowkक्रांती चौकAurangabadऔरंगाबाद