शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाईन फ्लू’ची पुन्हा धास्ती

By admin | Updated: March 25, 2017 22:55 IST

उस्मानाबाद : शेजारील सोलापूरसह पुणे जिल्हा व परिसरात स्वाईन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आ

उस्मानाबाद : शेजारील सोलापूरसह पुणे जिल्हा व परिसरात स्वाईन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे़ मागील महिन्यातच या आजाराने उमरगा तालुक्यातील एका रुग्णाचा बळीही गेला असून, शहरातील काहींना स्वाईन फ्लूची औषधे देण्यात आली आहेत़ परिणामी स्वाईन फ्लूची अनेकांना धास्ती लागली असून, या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन विभागासह इतर यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे़गतवर्षी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात स्वाईन फ्लू सदृश्य रुग्ण आढळून आले होते़ मात्र, प्रशासनाने वेळीच केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णांवर योग्य उपचार झाले होते़ मध्यंतरी गायब झालेले स्वाईन फ्लूचे विषाणू पुन्हा फोफावताना दिसत आहेत़ मागील महिन्यातच उमरगा तालुक्यातील एका रुग्णाचा या आजाराने बळी घेतला आहे़ तर उस्मानाबाद शहरातील एका कुटुंबातील सात जणांना जिल्हा रुग्णालयात स्वाईन फ्लूची औषधे देण्यात आली आहेत़ मागील काही दिवसांपासून सर्दी, खोकला,अंगदुखीसह इतर आजाराचे रुग्ण वाढले असून, अनेकांनी रुग्णालयात उपचार घेणे सुरू केले आहे़ विशेष म्हणजे उस्मानाबाद येथून सोलापूर येथे उपचारासाठी गेलेल्या काही रुग्ण स्वाईनफ्लूसदृश्य आढळून आल्याचे वृत्त आहे. त्यांच्यावर संबंधित रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत़ विशेषत: सोलापूर व पुणे येथे स्वाईन फ्लूने पुन्हा डोके वर काढले असून, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे़ या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे़ पुण्यासह सोलापूर येथे जिल्ह्यातून शेकडो नागरिक विविध कामासाठी प्रवास करतात़ त्यामुळे ‘पुणे टू उस्मानाबाद’ किंवा ‘सोलापूर टू उस्मानाबाद’ या मार्गाने स्वाईन फ्लूचा आजार जिल्ह्यात फोफावण्याची शक्यता नाकारता येत नाही़ या आजरापासून बचाव करण्यासासाठी नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेणे गरजेचे आहे. जिल्हा रुग्णालयातही आयसोलेशन विभाग तयार करण्यात आला आहे़ स्वाईन फ्लूच्या गोळ्या, लहान मुलांची औषधे, व्हेंटेलेटरसह स्वॅब घेण्याच्या ४० किट जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहेत़ याशिवाय अयसोलेशन विभागात चार वैद्यकीय अधिकारी, सहा कर्मचारी, वर्ग चारचे सहा कर्मचारीही कार्यरत आहेत़ रुग्णालयात सर्दी-खोकल्यासह अंगदुखीसाठी येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले जात आहेत़