आशपाक पठाण , लातूरविवाह हा आयुष्यातील सर्वात मोठा अविस्मरणीय क्षण़ पण तो कोणाच्या नशिबी कधी येईल, याचा नेम नसतो़ त्यातच शारिरिक व्यंग, अपंगत्व असल्यास तर बरीच ससेहोलपट होते़ अहो, पण ज्यांची उंचीच अडीच फुट असेल तर त्याला मुलगी देणार कोण? सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून रविवारी लातुरात अडीच फुट उंचीच्या जोडप्याचा विवाह पार पडला़ यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनाला भिडला होता़उदगीर शहरातील जावेदपाशा शेख (वय २१) यांची उंची जवळपास अडीच फुट़ परिस्थिती हलाखीची असल्याने मिळेल ते काम करून तो आपली उपजिविका भागवितो़ उंची कमी असल्याने कोणी काम देत नाही, त्यामुळे त्याने फळविक्रीचा व्यवसाय सुरू केला़ आपलेही लग्न व्हावे, अशी त्याची मनापासून ईच्छा़ पण त्याच्या उंचीची मुलगी मिळत नव्हती़ परंतु, दहा दिवसांपूर्वी लातूर शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच उंचीच्या मुलीचा शोध घेऊन जावेदपाशाचा विवाह धार्मिक विधीप्रमाणे रविवारी लावला़ लातूरच्या दीपज्योतीनगर भागात राहणाऱ्या कुटुंबातील सुलतानाबानो शेख (वय २०) हीची उंचीही जावेद एवढीच असल्याने सोयरीक झाली़ सुलतानाबानो यांच्या आईचे लहानपणीच निधन झाले़ वडिलांचाही दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला़ नातेवाईकांनी तिचा सांभाळ केला़ लातूर येथील ताहेर शेख, उदगीरचे अब्दुल नबी राजा पटेल यांनी काही मित्राच्या मदतीने या जोडप्याचा विवाह अत्यंत थाटात लावून दिला़ यावेळी सामाजिक कार्यकर्ते एऩ एऩ इनामदार, भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आरेफ सिद्दिकी, युनुसखान पठाण, इस्माईल सय्यद, युनूसभाई गुत्तेदार, मासूम खान, अब्दुल खदीर खाजा पटेल, अस्लम पठाण, मसूद चौधरी, सादिक शेख, मजहर सय्यद आदींनी सहकार्य केले़ वधू-वरांना आशिर्वाद देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आप्तस्वकियांनी मोठी गर्दी केली होती़ हा विवाह सोहळा रविवारी लातूर शहरात कुतुहलाचा झाला़ अनेकांनी या नवदाम्पत्यांना आर्शिवाद दिले़
स्वप्न साकारले अन् आनंद गगनात मावेना...
By admin | Updated: November 22, 2015 23:42 IST