शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाधार’ शिष्यवृत्तीचा पेच सुटेना; निधी पडून, ‘व्हीपीडीए’साठी कागदपत्रांची प्रतीक्षा

By विजय सरवदे | Updated: June 13, 2024 12:15 IST

 साडेचार हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लटकली

छत्रपती संभाजीनगर : पूर्वी विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी महिनोमहिने प्रतीक्षा करावी लागायची. आता समाजकल्याण कार्यालयाकडे तीन महिन्यांपासून निधी पडून आहे, पण ही शिष्यवृत्ती अदा करण्यासाठी ‘व्हीपीडीए’ या नवीन प्रणालीसाठी विद्यार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रेच मिळेनात. त्यामुळे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील सुमारे साडेचार हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लटकली आहे.

आता या शिष्यवृत्ती योजनेसाठी दोन महिन्यापूर्वी शासनाने काही तांत्रिक बदल केले आहेत. पूर्वी शिष्यवृत्तीची रक्कम समाज कल्याण सहायक आयुक्तांच्या खात्यावर जमा व्हायची, ती आता थेट कोषागार कार्यालयात ‘व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाैंट’मध्ये (व्हीपीडीए) जमा होणार आहे. सध्या समाज कल्याण विभागामार्फत हे ‘व्हीपीडीए’ हे खाते तयार केले जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना लिंक केलेले पॅनकार्ड आणि आधारकार्ड, कॅन्सल चेक जमा करावा लागणार आहे. ज्यांच्याकडे चेक नाही, त्यांनी बँक पासबुकची झेरॉक्स प्रत जमा केली तरी चालते. मात्र, सध्या काही विद्यार्थ्यांनी पाेस्टल बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ इंडियाचे पासबुक जमा केले आहेत. पण, या तिन्ही बँकांचे ‘आयएफसी’ कोड हे ‘व्हीपीडीए’ खात्याशी जुळत नाहीत. त्यामुळे समाज कल्याण कार्यालयाच्या अडचणी वाढल्या आहेत. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील सुमारे साडेचार हजार विद्यार्थ्यांपैकी जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांकडूनच कागदपत्रे जमा करण्यात आली आहेत. उर्वरित ३ हजार विद्यार्थ्यांनी अजूनही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे समाज कल्याण कार्यालयासमोर या शिष्यवृत्तीचा पेच निर्माण झाला आहे.

आता समाज कल्याणलाच विद्यार्थ्यांची प्रतीक्षाशैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ चे नियमित विद्यार्थी तसेच तत्पूर्वीच्या वर्षात त्रुटीत निघालेल्या विद्यार्थ्यांच्या ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी समाज कल्याण विभागाकडे मार्चअखेर १९ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यांना ‘व्हीपीडीए’ प्रणालीद्वारेच स्वाधार शिष्यवृत्ती देण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आधारकार्ड, पॅनकार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स एवढी कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, पाेस्टल बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ इंडिया या बँकांत खाते असेल, तर त्याऐवजी दुसऱ्या बँकेत खाते उघडून संबंधित कागदपत्रे विनाविलंब सादर करावीत, असे आवाहन समाज कल्याणच्या जिल्हा कार्यालयाने केले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादScholarshipशिष्यवृत्तीEducation Sectorशिक्षण क्षेत्र