शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचा जोर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2016 23:10 IST

बीड : जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी बुधवारी अवकाळी पावसाने हाहाकार उडाला. ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.

बीड : जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी बुधवारी अवकाळी पावसाने हाहाकार उडाला. ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. शिरूर कासार तालुक्यात एका महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. आष्टी, बीड, अंबाजोगाई तालुक्यात वीज कोसळून गुरे दगावली. घरावरील पत्रे उडून गेल्याने अनेकांना बेघर व्हावे लागले. पहिल्या तडाख्यातून छावण्या पुरत्या सावल्या नव्हत्या तोच पुन्हा गुरांच्या डोक्यावरील छप्पर हिरावले.सकाळपासूनच आकाशात काळे ढग जमले होते. वातावरणात उष्णताही जाणवत होती. दुपारनंतर जोरदार वारे वाहू लागले. पावसामुळे गेवराई येथील आठवडी बाजारात पाणीच-पाणी साचले होते. त्यामुळे बाजारकरूंची फजिती झाली.परळी तालुक्यातील सिरसाळा, बीड तालुक्यातील चौसाळा, हिंंगणी बुद्रुक, नागझरी, केत्तुरा तर शिरुर, केज, धारुर तालुक्यालाही पावसाने झोडपले. शिरुरकासार तालुक्यातील रायमोहा येथील अनिस शेख यांच्या घरावरील २५ पत्रे उडून गेले. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून मदत करण्याची मागणी भाजपचे गोकूळ सानप यांनी केली आहे. कडब्यासह गहू काळवंडलारबी हंगामातील ज्वारीची काढणी झाली असली तरी कडबा शेतातच पडून आहे. तर गव्हाचे पीक काढणीला आलेले असतानाच अवकाळीचा मारा झाला आहे. त्यामुळे गव्हाची पडझड झाली.सात गुरे दगावलीअंबाजोगाई तालुक्यातील येल्डा येथे गोठ्यावर वीज पडून पाच गुरे दगावली. शिवाय बीड तालुक्यातील नेकनूर येथील छावणीत विजेने गायीचा बळी घेतला. आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे वीज पडल्याने मळणीयंत्र घेऊन निघालेले शिवाजी दशरथ बिरंगळ जखमी झाले. एक बैल दगावला. (प्रतिनिधी)