शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेचा संशयास्पद मृत्यू; आईवर संशय

By admin | Updated: May 20, 2014 01:32 IST

वाळूज महानगर : सात महिन्यांपूर्वी वाळूज परिसरातील शिवराई शिवारात एक महिन्याच्या बालिकेचा संशयास्पद मृत्यू झाला होता.

वाळूज महानगर : सात महिन्यांपूर्वी वाळूज परिसरातील शिवराई शिवारात एक महिन्याच्या बालिकेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणी वाळूज पोलिसांनी आज तिच्या आईलाच ताब्यात घेतले. त्यामुळे या गंभीर घटनेला कलाटणी मिळाली आहे. दिलीप लक्ष्मण कर्जुले हा पत्नी चंदाबाई आणि दोन लहान मुलींसह नवीन शिवराईत वास्तव्यास आहे. ६ आॅक्टोबर-२०१४ रोजी दिलीप रात्री कामासाठी कंपनीत गेला होता. घरातील एका खोलीत दिलीप यांचे आई-वडील व भाऊ, तर दुसर्‍या खोलीत चंदाबाई दोन्ही मुलींसोबत झोपली होती. पहाटे ३ वाजेच्या सुमारास चंदाबाई ही घराचा दरवाजा उघडून शौचासाठी बाहेर पडली. परत आल्यानंतर चंदाबाई पुन्हा झोपली. पहाटे ४ वाजेच्या सुमारास झोक्यात एक महिन्याची मुलगी गायब असल्याचे तिच्या लक्षात आले. ७ आॅक्टोबरला सकाळी ९ वाजेच्या सुमारास चंदाबाईने वाळूज पोलीस ठाण्यात मुलगी गायब झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास दिलीप कर्डिले यांच्या घराच्या पाठीमागे काटेरी झुडपात गायब झालेल्या लहान मुलीचा जळालेला मृतदेह पोलिसांना आढळून आला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयाची सुई आईकडे एक महिन्याच्या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी वाळूज पोलिसांनी चंदाबाई कर्डिले हिला संशयावरून आज १९ मे रोजी ताब्यात घेतले. रासायनिक विश्लेषण तज्ज्ञाच्या अहवालानुसार चंदाबाईच्या अंगावरील कपड्यांना रॉकेलचा वास येत होता. आता तिच्याकडून कोणती माहिती बाहेर येते याकडे वाळूज पंचक्रोशीचे लक्ष लागले आहे.