शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

उमरी लाच प्रकरणातील महिला अधिकाऱ्याचे निलंबन लांबणीवर

By admin | Updated: August 20, 2014 00:17 IST

बी.व्ही. चव्हाण, उमरी येथील बालविकास प्रकल्प अधिकारी निलंबनाची कारवाई लांबणीवर टाकण्यात आल्याबद्दल जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़

बी.व्ही. चव्हाण, उमरीयेथील बालविकास प्रकल्प अधिकारी शांता सुरेवाड यांना ३० हजारांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडून कारवाई केली असताना त्या कामावर परत आल्या़ त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई लांबणीवर टाकण्यात आल्याबद्दल जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़एखाद्या लोकसेवकाला लाच घेताना पकडल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई लगेच करण्यात येते़ यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्या प्रवृत्तीवर आळा बसण्यासाठी हा एक पहिला व महत्त्वाचा उपाय आहे़ यामुळे जनतेत व लोकसेवकात चांगला संदेश जाण्यास मदत होते़ बळेगाव ता़उमरी येथील मदतनीस कर्मचाऱ्याची भरती करण्यात आली़ उमेदवाराला नियुक्तीचे आदेश देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना बालविकास प्रकल्प अधिकारी शांता अमृतराव सुरेवाड यांना रंगेहाथ पकडले होते़ ७ आॅगस्ट रोजी भावसार चौक हनुमान अपार्टमेंट, नांदेड येथे एसीबीचे उपअधीक्षक एम़जी़ पठाण यांच्या पथकाने ही कारवाई केली़ जामीनावर सुरेवाड यांची सुटका झाली़ त्यामुळे पुन्हा त्या कामावर आल्या़ उमरी ३ अंगणवाडी सेविका, ८ मिनी अंगणवाडी सेविका व १४ मदतनीस अशा एकूण २५ कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रिया झाली़ या प्रक्रियेच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या आहेत. मात्र याकडे पूर्ण दुर्लक्ष करून भरतीप्रक्रिया आटोपण्यात आली़ विशेष म्हणजे कार्यालयातील शिक्के, आदेशाच्या प्रती, निवड प्रक्रियेतील महत्त्वाचे रजिस्टर व कागदपत्रे हा दस्तावेज अधिकाऱ्यांनी घरी नेला़ घरातूनच सर्व भरती प्रक्रिया बेदरकारपणे चालू होती़ या गैरप्रकाराबद्दल उमरी तालुक्यातील अनेक उमेदवार व नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या़ काही घडलेच नाही अशा अविर्भावात संबंधित लाचखोर अधिकारी कामावर आल्या़ एसीबीने त्याच दिवशी सदर कारवाईची माहिती जिल्हा परिषदेला दिली़ मात्र अद्याप त्यावर कसलीच कारवाई झाली नाही़ भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अडकलेल्यांंवर लगेच निलंबनाची कारवाई करण्याची तरतूद आहे़ येथे ३० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडून कारवाई झाली असताना अधिकारी उजळ माथ्याने फिरत आहेत़ उमरीत तहसीलदार उदयकुमार शहाणे, पोलिस निरीक्षक विठ्ठल चव्हाण, पोलिस जमादार भानुदास वैद्य यानंतर आता बालविकास प्रकल्प अधिकारी शांता सुरेवाड अशी सरकारी सेवकांची शृंखला एसीबीच्या जाळ्यात अडकली़ यावरून अधिकारी कर्मचाऱ्यांकडून जनतेची लुट होत असल्याचे सिद्ध झाले़ यातील पोलिस खात्यातील दोघांचे लगेच निलंबन झाले़ मात्र इतर खात्यातील कर्मचाऱ्यांचे का होत नाही असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे़