शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

सपोनिसह चौघे निलंबित

By admin | Updated: February 9, 2015 00:44 IST

उस्मानाबाद : वरिष्ठांनी वेळोवेळी सूचना देवूनही कर्तव्यात कसूर केल्यामुळे मुख्यालयातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चार कर्मचाऱ्यांना निलंबनाचा तडाखा बसला आहे़

उस्मानाबाद : वरिष्ठांनी वेळोवेळी सूचना देवूनही कर्तव्यात कसूर केल्यामुळे मुख्यालयातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चार कर्मचाऱ्यांना निलंबनाचा तडाखा बसला आहे़ ही कारवाई रविवारी विशेष पोलीस महानिरीक्षकांसह पोलीस अधीक्षकांनी केल्याचे विश्वासनीय वृत्त आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अमितेषकुमार हे शनिवारपासून मुख्यालयासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांची वार्षिक तपासणी करीत आहेत़ वार्षिक तपासणी पूर्वी वरिष्ठांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कामकाज वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ मात्र, वारंवार सूचना करूनही पोलीस महानिरीक्षकांच्या वार्षिक तपासणीदरम्यानच काहींनी कर्तव्यात कसूर केल्याचे समोर आले आहे़ त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी रविवारी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढल्याचे वृत्त आहे़ याबाबत पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होवू शकला नाही़ मुख्यालय व परिसरात मात्र, सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह एक, दोन नव्हे तीन कर्मचारी निलंबित केल्याची जोरदार चर्चा असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत़विशेष पोलिस महानिरीक्षक अमितेष कुमार यांनी शनिवारी उमरगा व नळदुर्ग पोलिस ठाण्याला भेट देवून तपासणी केली. त्यावेळी अनेक गुन्ह्यांच्या संचिका प्रलंबित असल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची त्यांनी झाडाझडती घेतली. तसेच रविवारी उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात तपासणी करण्यात आली असून, येथेही काही प्रलंबित गुन्ह्यांबाबत नाराजी व्यक्त केली.