शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पैठण येथील वाळूपट्टा उत्खननास स्थगिती

By admin | Updated: May 8, 2016 01:08 IST

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील वाळू उपशाला न्या. संजय गंगापूरवाला व न्या. के. के. सोनवणे यांनी दहा दिवसांची स्थगिती दिली आहे.

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील वाळू उपशाला न्या. संजय गंगापूरवाला व न्या. के. के. सोनवणे यांनी दहा दिवसांची स्थगिती दिली आहे. यासंबंधी मुंबईमधील मंत्रालयातील संबंधित मंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या समितीसमोर हजर होऊन वाळूपट्ट्यासंबंधी परवानगी घेण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. वैजापूर तालुक्यातील जळगाव व शहजतपूर येथील २०१३ च्या वाळू उत्खननाच्या परवानगीची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने २०१६ मध्ये केली. वर्ष संपल्यानंतर संबंधित वाळूपट्टा उपशाची फेरपरवानगी मंत्र्यांकडून घ्यावी लागते; परंतु वैजापूर तालुक्यातील वाळूपट्टा उपशाची परवानगी मंत्र्यांनी देणे गरजेचे असताना संबंधित पट्ट्याची परवानगी दिली नाही. पैठण तालुक्यातील आवडे उंचेगाव वाळूपट्ट्याची परवानगी जिल्हा प्रशासनाकडून सर्व नियम धाब्यावर बसवून देण्यात आली. याविरोधात खंडपीठात याचिका दाखल केली. रावसाहेब मोहन टेके (रा. शिवपूर, ता. गंगापूर) यांना वैजापूर तालुक्यातील जळगाव वाळूपट्टा उपशाचा ठेका देण्यात आला होता. त्यांना ३१ नोव्हेंबर २०११ मध्ये ४,९४७ ब्रास उत्खननाची परवानगी देण्यात आली होती. परंतु संबंधित ठेकेदाराने एक हजार ब्रास वाळूचा जास्तीचा उपसा केल्याने त्यांना ३२ लाख रुपये दंड आकारण्यात आला होता. याविरुद्ध त्यांनी खंडपीठात दाद मागितली होती. खंडपीठाने समिती नेमून अहवाल मागविला होता. नंतर याचिकाकर्ते विष्णू विठ्ठलराव मसुरे यांनी मंत्र्यांकडे दाद मागितली असता मंत्र्यांनी टेके यांचा दंड माफ करून उर्वरित वाळू उपशास परवानगी दिली होती. संबंधित वाळूपट्ट्याची परवानगी देण्याचे अधिकार मंत्र्यांना असताना टेके यांना जिल्हा प्रशासनाने मंत्र्यांचे अधिकार वापरून परवानगी दिली आणि परवानगीही वैजापूर तालुक्यातील पट्ट्याची न देता पैठण तालुक्यातील आवडे उंचेगावचा ठेका देण्यात आला. याविरोधात अ‍ॅड. संभाजी टोपे यांच्या वतीने खंडपीठात आव्हान देण्यात आले. शासनातर्फे अ‍ॅड. बी. ए. शिंदे तर प्रतिवादीतर्फे अ‍ॅड. आर. व्ही. गोरे यांनी काम पाहिले.