शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

वीज महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ निलंबित

By admin | Updated: May 4, 2016 00:29 IST

उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील भोत्रा शिवारात काम करताना वीज सेवकाचा सोमवारी विद्युत धक्क्याने मृत्यू झाला होता़ या प्रकरणात महावितरणकडून करण्यात आलेल्या

उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील भोत्रा शिवारात काम करताना वीज सेवकाचा सोमवारी विद्युत धक्क्याने मृत्यू झाला होता़ या प्रकरणात महावितरणकडून करण्यात आलेल्या चौकशीत वरिष्ठ तंत्रज्ञ हे प्रथम दर्शनी दोषी आढळून आले असून, कार्यकारी अभियंत्यांनी निलंबित केले आहे़परंडा तालुक्यातील पिंपळवाडी येथील गणेश मुकुंद आलाट (वय-२४) हा वीज सेवक म्हणून काम करणारा युवक सोमवारी सकाळी भोत्रा शिवारातील विद्युत खांबावर काम करण्यासाठी परमीट घेवून गेला होता़ तो खांबावर चढून काम करीत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने त्याला जोराचा विद्युत धक्का बसला़ त्याला उपचारासाठी परंडा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले़ या प्रकरणाच्या चौकशीत वीज वाहिनीवरील काम करण्यापूर्वी नियमाप्रमाणे लाईनवर परमीट न घेता हँडल ट्रॅप करण्यात आल्याचे समोर आले होते़ या प्रकरणात प्रथम दर्शनी वरिष्ठ तंत्रज्ञ लक्ष्मण दत्तू गिरी हे दोषी आढळून आल्याने कार्यकारी अभियंत्यांनी त्यांना निलंबित केले आहे़ तर कनिष्ठ यंत्रचालक आय्युब इस्माईल चौधरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़सराटी प्रकरणातही गुन्हादरम्यान, तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील नितीन लक्ष्मण कंटेकूरे या युवकाचाही महावितरणच्या पोलवरील वायर जोडताना विद्युत धक्का लागून मृत्यू झाला होता़ या प्रकरणात दोषी असणाऱ्यांविरूद्धही महावितरण कडून नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे़