शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित सरकारी कर्मचाऱ्याने नोकरीच्या आमिषाने अनेकांना गंडविले

By | Updated: November 26, 2020 04:12 IST

औरंगाबाद: रेल्वे आणि यूथ इंटरनॅशनल स्काउट ॲण्ड गाईड मध्ये विविध पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला ...

औरंगाबाद: रेल्वे आणि यूथ इंटरनॅशनल स्काउट ॲण्ड गाईड मध्ये विविध पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी रात्री अटक केली.

अशोक साहेबराव वैद्य (२९, रा. जमनज्योती, हर्सूल ) असे आरोपीचे नाव आहे. तो नाशिक येथे शासकीय अंध मुलींच्या निवासी शाळेतील निलंबित कनिष्ठ काळजीवाहक आहे. तक्रारदार योगेश नामदेव गोरे (रा. पुष्पक गार्डन, चिकलठाणा) हे पदव्युत्तर पदवीधर असून नोकरीच्या शोधात आहेत. गतवर्षी त्यांची ओळख आरोपी वैद्यसोबत झाली. तेव्हा त्याने त्यांची रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ओळख असून त्याने अनेकांना टी. सी. म्हणून नोकरी लावल्याचे सांगितले. योगेशला रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ११ लाख रुपयांची मागणी केली. योगेशने पैसे देण्याची तयारी दर्शविली आणि लगेच त्याच्या बॅंंक खात्यात ५० हजार रुपये जमा केले. उर्वरित साडेदहा लाख त्यांनी रोखीने दिले. वैद्यने योगेश आणि अन्य एक तरुण अक्षय गायके यांच्याकडून प्रत्येकी ११ लाख रुपये घेऊन त्यांना नियुक्तीपत्रे दिली. त्यांना दिल्लीला पाठवले. दोन दिवसाने तो तेथे आला. तेथून त्यांना बिहारमध्ये नेले. तेथे प्रशिक्षणाच्या नावाखाली त्यांना १५ दिवस ठेवले. यानंतर ते परतले. हा सगळा बनवाबनवीचा प्रकार असल्याचे समोर येताच योगेश आणि अक्षयने पैशाची मागणी केली. सुरूवातीला आज उद्या करून टाळाटाळ करू लागला. त्यांनी जास्त तगादा लावल्यावर त्याने ४ लाख रुपये परत केले. आणि पाच लाखांची उसनवारी पावती तयार करून दिली. एक लाख रुपये नगदी देण्याचे सांगितले. मात्र त्याने पैसे दिले नाही.

त्याने जालना रोडवरील कुशलनगर येथे यूथ इंटरनॅशनल स्काउट ॲण्ड गाईडचे कार्यालय थाटले. या कार्यालयातर्फे त्याने अनेकांना विविध पदाच्या नियुक्तीपत्रे देऊन लाखों रुपये उकळून फसवणूक केली.

चौकट

पोलीस आयुक्तांच्या आदेशाने झटपट कारवाई

वैद्यने अनेकांना गंडविल्याचे समोर येताच योगेशसह सुमारे दहा जणांनी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची भेट घेऊन तक्रार केली. आयुक्तांनी दिलेल्या आदेशानंतर गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक अजबसिंग जारवाल आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी त्याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याच्याविरुद्ध रात्री जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करून रात्री त्याला अटक करण्यात आली.

====

२७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे येताच पोलीस निरीक्षक डी. एस. शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय सूर्यवंशी, हवालदार विठ्ठल मानकापे, महेश उगले यांनी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.