शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

अभियंता, सहायक लेखापाल निलंबित

By admin | Updated: May 31, 2017 00:36 IST

उदगीर : लातूरच्या अधीक्षक अभियंत्यांनी तत्कालीन उपकार्यकारी अभियंता कैलास मोहिते व सध्या सहायक लेखापाल म्हणून परळी विभागात कार्र्यरत असलेल्या विष्णू चाटे यांना सोमवारी निलंबित केले

चेतन धनुरे। लोकमत न्यूज नेटवर्कउदगीर : महावितरणच्या देवणी विभागात कार्यरत असताना तब्बल ५५७ ग्राहकांच्या वीज बिल देयके दुरुस्तीत गैरकृत्य केल्याचा ठपका ठेवत लातूरच्या अधीक्षक अभियंत्यांनी तत्कालीन उपकार्यकारी अभियंता कैलास मोहिते व सध्या सहायक लेखापाल म्हणून परळी विभागात कार्र्यरत असलेल्या विष्णू चाटे यांना सोमवारी निलंबित केले आहे़ ‘लोकमत’ने हे गैरकृत्य एका वृत्तमालिकेद्वारे काही दिवसांपूर्वीच चव्हाट्यावर आणले होते़देवणी विभागात कार्यरत असताना उपकार्यकारी अभियंता कैलास मोहिते व तत्कालीन वरिष्ठ लिपीक विष्णू चाटे यांनी विभागातील ५५७ ग्राहकांच्या वीज बिल देयकांची तब्बल ३८ लाख ९३ हजार ३०७ रुपयांची ‘अ‍ॅडजस्टमेंट’ करुन देत ती कमीकेली होती़ परंतु ही प्रक्रिया राबविताना महावितरणने घालून दिलेल्या नियमावलींचे पालन करण्यात आले नव्हते़ हा प्रकार ‘लोकमत’मधून एका वृत्तमालिकेद्वारे चव्हाट्यावर आणण्यात आला होता़ हे प्रकरण महावितरणच्या लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम बुरुड यांनी गांभिर्याने घेत चौकशीचे आदेश दिले होते़ मंडळ कार्यालयाच्या वतीने गठित करण्यात आलेल्या समितीने या प्रकाराची चौकशी करुन अहवाल सादर केला़ त्यात देवणीचे तत्कालीन उपकार्यकारी अभियंता कैलास मोहिते व वरिष्ठ लिपीक विष्णू चाटे यांच्यावर गैरकृत्याचा ठपका ठेवला आहे़ मोहिते यांनी त्यांच्या कार्यकाळात कंपनीच्या नियमांचे पालन न करता देवणी विभागातील दुरुस्तीस पात्र नसलेल्या ५५७ ग्राहकांचे ३८ लाख ९३ हजार ३०७ रुपये कमी केल्याचे निलंबन आदेशात म्हटले आहे़ ५५६ पैकी ५४१ ग्राहकांचे स्वत: मोहिते यांनी तर १६ ग्राहकांचे चाटे यांनी दुरुस्ती प्रस्ताव सादर करुन ते बेकायदेशीररीत्या मंजूर करीत कंपनीची ३८ लाख ९३ हजार ३०७ रुपयांची फसवणूक केल्याचेही आदेशात म्हटले आहे़ यानुषंगाने मोहिते व चाटे या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे़ या आदेशावर अधीक्षक अभियंता सचिन तालेवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत़कैलास मोहिते हे सध्या ठाणे शहर मंडळ कार्यालयात उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत़ त्यांना निलंबन काळात भांडुपच्या कार्यकारी अभियंत्यांकडे आठवड्यातून तीन दिवस हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ तर सध्या परळी उपविभागात सहायक लेखापाल म्हणून कार्यरत असलेल्या चाटे यांना अंबाजोगाई विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे हजेरी देण्याचे आदेशित केले आहे़