शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद झेडपीत भाजप सदस्य निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:19 IST

परवानगी घेऊनच सदस्यांनी बोलावे, असा आग्रह जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी सर्वसाधारण सभेत धरला. अध्यक्षांचा हा आदेश दुर्लक्षित करीत सभागृहातील माईकवर आपले बोलणे सुरूच ठेवणाऱ्या जिल्हा परिषदेतील भाजप सदस्य एल.जी. गायकवाड यांना अध्यक्षांनी खाली बसण्यास सांगितले. तेव्हा चिडून जाऊन गायकवाड यांनी अगोदर आपल्या पतीची लुडबूड थांबवा, असा थेट आरोप अध्यक्षांवर केला. त्यामुळे संतप्त झालेल्या अध्यक्षांनी गायकवाड यांचे सदस्यत्व तडकाफडकी एक दिवसासाठी निलंबित केले.

ठळक मुद्देअध्यक्षा संतापल्या : पतीची लुडबूड थांबवा म्हणाले सदस्य गायकवाड

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : परवानगी घेऊनच सदस्यांनी बोलावे, असा आग्रह जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी सर्वसाधारण सभेत धरला. अध्यक्षांचा हा आदेश दुर्लक्षित करीत सभागृहातील माईकवर आपले बोलणे सुरूच ठेवणाऱ्या जिल्हा परिषदेतील भाजप सदस्य एल.जी. गायकवाड यांना अध्यक्षांनी खाली बसण्यास सांगितले. तेव्हा चिडून जाऊन गायकवाड यांनी अगोदर आपल्या पतीची लुडबूड थांबवा, असा थेट आरोप अध्यक्षांवर केला. त्यामुळे संतप्त झालेल्या अध्यक्षांनी गायकवाड यांचे सदस्यत्व तडकाफडकी एक दिवसासाठी निलंबित केले.आज बुधवारी जिल्हा परिषदेत अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा होती. तत्पूर्वी, सकाळी अर्थ समितीचे सभापती विलास भुमरे यांनी एका हॉटेलमध्ये जेवण दिले. या जेवणावर भाजप सदस्यांनी बहिष्कार टाकला होता. तेव्हाच आजच्या सर्वसाधारण सभेत भाजप सदस्य सत्ताधाºयांना कात्रीत पकडणार असल्याची कुणकुण लागली होती. दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा सुरू झाली. सुरुवातीला इतिवृत्ताच्या अनुपालनावर चर्चा सुरू झाली. तेव्हापासूनच भाजप सदस्य शिवाजी पाथ्रीकर, एल.जी. गायकवाड, मधुकर वालतुरे, किशोर पवार, पुष्पा काळे, सुरेश गुजराने यांनी सभागृहाला धारेवर धरले. मागील तीन महिन्यांपूर्वी आम्ही सर्व सदस्यांना निधी वाटपामध्ये समान न्याय द्यावा, पक्षपाती भूमिका घेऊ नका, असा आग्रह धरला होता. तेव्हा अध्यक्षा डोणगावकर यांनी यापुढे कोणावरही अन्याय होणार नाही, सर्वांना निधीचे समान वाटप केले जाईल, असे आश्वासन दिले होते. अद्यापही भाजपच्या ६ सदस्यांना विकासकामासाठी एक रुपयाही निधी दिलेला नाही, याचे सभागृहाला उत्तर द्यावे, असा आग्रह एल.जी. गायकवाड यांनी धरला. गायकवाड यांच्या आग्रहानुसार अर्थसभापती विलास भुमरे यांनी ३१ मार्चअखेरपर्यंत वंचित ६ सदस्यांना निधी देण्याचे आश्वासन दिले; परंतु भाजप सदस्य ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. पाथ्रीकर म्हणाले, तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही. किशोर पवार, गुजराने यांनीही आरोप केले. एल.जी. गायकवाड म्हणाले, सदस्यांना सभागृहात बोलण्याचा अधिकार आहे. अध्यक्षा अधिकच संतापल्या व म्हणाल्या, सदस्यांना जसे अधिकार आहेत, तसे मलाही काही अधिकार आहेत. हे ऐकून गायकवाड यांनी अगोदर पतीची लुडबूड थांबवा व स्वत: निर्णय घ्या. हे वाक्य ऐकताच त्यांनी गायकवाड यांना एक दिवसासाठी निलंबित केले.आरोप खोटा असेल, तर सिद्ध कराएल.जी. गायकवाड यांना निलंबित केल्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. अध्यक्षांनी १० मिनिटांसाठी सभा तहकूब केली. पुन्हा ३.३० वाजता सभा सुरू झाली. तेव्हा भाजप गटनेते पाथ्रीकर, वालतुरे यांनी अध्यक्षांना विनंती केली. गायकवाड हे भावनेच्या भरात बोलले असावेत. आज अर्थसंकल्पीय सभा आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन रद्द करण्यात यावे; मात्र शेवटपर्यंत अध्यक्षा देवयानी पाटील आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. त्या म्हणाल्या, गायकवाड यांनी वैयक्तिक माझ्यावर आरोप केला आहे. माझ्या कौटुंबिक भावनेला त्यांनी हात घातला आहे. ही बाब सभागृहातील एकाही महिला सदस्यास पटलेली नाही. दरम्यान, मी केलेला आरोप खोटा असेल, तर सिद्ध करून दाखवावे, असे म्हणत गायकवाड यांनी सहकारी सदस्यांचा सभागृहात बसण्याचा आग्रह झिडकारत सभागृहाबाहेर जाणे पसंत केले.