शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

संशयितांची पोलिसांशी हुज्जत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:28 IST

वीजचोरी प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या दोघांनी ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या येथील महावितरण पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांशी हुज्जत घालून राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वीजचोरी प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या दोघांनी ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या येथील महावितरण पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांशी हुज्जत घालून राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी मुकुंदवाडी (औरंगाबाद) येथे हा प्रकार घडला. येथील महाविरतण पोलीस ठाण्यात ५८ हजारांची वीज चोरी केल्याप्रकरणी मुकुंदवाडी परिसरातील गोपी भीमराव भवरे (२८) व दीपक सोपानराव ऊर्फ उंकडराव शिलोडे (४३) यांच्या विरुद्ध २०१६ मध्ये गुन्हा दाखल आहे.संशयितांना पकडण्यासाठी गेल्यानंतर ते फरार होत असे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी महावितरण ठाण्याच्या अधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी, साहाय्यक उपनिरीक्षक रावसाहेब पडाळे, हेड कॉन्स्टेबल तात्यासाहेब पांढरे यांनी मुकुंदवाडी येथे जाऊन वरील दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी पोलीस अधिकाºयांशी हुज्जत घातली. बदनापूर येथील एका आमदाराचे जवळचे नातेवाईक असल्याची ओळख सांगून राजकीय दबाव वापरण्याचा प्रयत्न केला, असे साहाय्यक निरीक्षक सूर्यवंशी यांनी सांगितले.सदर आमदारानेही पोलीस अधिकाºयांना फोनवरून संपर्क करून दोघांना सोडून देण्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी दबावाला न जुमानता दोघांना ताब्यात घेऊन औरंगाबाद येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. औरंगाबाद परिक्षेत्रात ५० हजार ते एक लाखांपर्यंतच्या वीज चोरीची अनेक प्रकरणे दाखल असून, संबंधितांवर या पुढे अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.