औरंगाबाद : क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यींनी स्वीकारलेल्या पाच लाखांच्या लाच प्रकरणातील आरोपी, त्यांचा रायटर भीमराव पवार याने सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागासमोर (एसीबी) शरणागती पत्करली. पवारला खामगाव येथील विशेष न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.नोटांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या प्रकरणात औरंगाबाद क्राईम ब्रँचने बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील रहिवासी शेख शफी याला अटक केली होती. त्याला सहकार्य करण्यासाठी औरंगाबाद क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांनी १0 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणात ठाकरे यांचा रायटर भीमराव पवार यानेही सहकार्य केल्याचे तपासात समोर आले. तक्रारकर्त्याने रक्कम कमी करण्यासाठी ठाकरे व पवारला वारंवार विनंती केली, मात्र एवढी रक्कम द्यावीच लागणार असल्याची तंबी या दोघांनी दिल्यानंतर तक्रारकर्त्याने दीड लाख रुपयांची रक्कम त्यांना दिली.
शिवा ठाकरेंच्या ‘रायटर’ची शरणागती
By admin | Updated: February 10, 2015 00:33 IST