शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य ! ८० टक्के मोटार वाहन निरीक्षक नाकारतात चक्क पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 16:10 IST

गेल्या ९ वर्षांपासून ‘गट-अ’ मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेले अनेक ‘एआरटीओ’ आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत, तरीही दुर्लक्ष होत असल्याने राज्यभरातील ‘एआरटीओ’ आता एकजूट झाले आहेत.

ठळक मुद्दे राज्यभरातील ७० सहायक प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना (एआरटीओ) चक्क राजपत्रित अधिकारी गट-ब दर्जा आहेदुसरीकडे या पदापेक्षा कनिष्ठ पदावरील मोटार वाहन निरीक्षकांना मात्र वर्ग-अ दर्जा देण्यात आला आहे.अनेक ‘एआरटीओ’ आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत, तरीही दुर्लक्ष होत असल्याने राज्यभरातील ‘एआरटीओ’ आता एकजूट झाले आहेत.

औरंगाबाद : राज्यभरातील ७० सहायक प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना (एआरटीओ) चक्क राजपत्रित अधिकारी गट-ब दर्जा आहे, तर दुसरीकडे या पदापेक्षा कनिष्ठ पदावरील मोटार वाहन निरीक्षकांना मात्र वर्ग-अ दर्जा देण्यात आला आहे. या दर्जामुळे ८० टक्के मोटार वाहन निरीक्षक पदोन्नती नाकारतात. गेल्या ९ वर्षांपासून ‘गट-अ’ मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेले अनेक ‘एआरटीओ’ आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत, तरीही दुर्लक्ष होत असल्याने राज्यभरातील ‘एआरटीओ’ आता एकजूट झाले आहेत.

राज्यभरातील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांची रविवारी (दि.७) शहरात बैठक पार पडली. राज्यभरातील ५५ ‘एआरटीओ’ बैठकीस उपस्थित होते. यावेळी दर्जा आणि वेतनश्रेणीच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर अधिकार्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सातारा येथील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी योगेश बाग, ठाण्याचे तानाजी चव्हाण, औरंगाबादचे ‘एआरटीओ’ रमेशचंद्र खराडे, श्रीकृष्ण नकाते यांची उपस्थिती होती. योगेश बाग म्हणाले, २००८ मध्ये एका अधिसूचनेद्वारे मोटार वाहन निरीक्षकांना गट-अ दर्जा देण्यात आला; परंतु ‘एआरटीओ’चा त्यात समावेश झाला नाही. राज्यभरात ‘एआरटीओ’ची १०० पदे असून, यातील ७० पदे भरलेली आहेत. मोटार वाहन निरीक्षकांच्या कामावर देखरेख ‘एआरटीओ’ ठेवतात; परंतु त्यांच्यापेक्षा ‘एआरटीओ’चा दर्जा कमी आहे.

अधिकार मोठे असूनही केवळ दर्जामुळे अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते.  ‘एआरटीओ’ना असलेल्या ‘ब’ दर्जामुळे ८० टक्के मोटार वाहन निरीक्षक पदोन्नती नाकारून ‘अ’ दर्जात कायम राहण्यास प्राधान्य देतात. निर्णय घेतला तर दोन दिवसांत हा दर्जा मिळू शकतो; परंतु ९ वर्षांपासून वारंवार मागणी करूनही ‘अ’ दर्जा देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे ते म्हणाले. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना अनेक बैठकांना हजेरी लावावी लागते. बैठकींना विविध अधिकारी उपस्थित असतात. अशावेळी गट-ब दर्जामुळे समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे ‘एआरटीओ’चे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षांत आरटीओ कार्यालयातील अधिकारी अडचणींसाठी एकत्र आलेले नाहीत; परंतु प्रथमच महाराष्ट्रातील ‘एआरटीओ’ राजपत्रित अधिकारी गट-अ दर्जा मिळविण्यासाठी एकत्र आले. सध्या वेतनवाढीचा मुद्दा नाही; परंतु हा दर्जा मिळाला पाहिजे, अशी मागणी आहे.

काळ्या फिती लावून कामकाजराजपत्रीत अधिकारी गट-अ (वरिष्ठ) दर्जा मिळावा, यासाठी प्रारंभी निवेदन देण्यात येणार आहे. तसेच सोमवारपासून एक महिना आरटीओ कार्यालयात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी काळ्या फिती लावून कामकाज करतील, तरीही दुर्लक्ष झाले तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असे योगेश बाग म्हणाले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसGovernmentसरकार