हिंगोली : जिल्ह्यातील शिधापत्रिकेवरील सर्व सदस्यांच्या आधार क्रमांकाचे लिंकिंग करण्यासाठी पुरवठा विभाग प्रयत्न करीत असला तरी तहसील कार्यालयांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्याची गती मंदावलेलीच आहे. सध्या जिल्ह्याचे काम ५५ टक्क्यांवर पोहोचले आहे. जिल्ह्यातील १२ लाख ३१ हजार शिधापत्रिकेवरील सदस्यांची नावे व आधार क्रमांक मिळविण्याच्या कामासाठी मागील काही दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानदारांना कामाला लावले आहे. अनेक दुकानदारांनी ८0 ते ९0 टक्क्यांपर्यंत लोकांचे आधार कार्ड क्रमांक भरून अहवाल सादर केले आहेत. मात्र शंभर टक्के आधार कार्ड अनेक गावांतून मिळत नसल्याने थोड्या कामासाठी सर्वच कामांवर परिणाम होत आहे. ज्यांचे हे क्रमांक मिळविण्याचे कामच अजून सुरू नाही, अशा दुकानदारांना मात्र आता कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. तहसील कार्यालयांना यासाठी सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. स्वस्त धान्य दुकानदारांना तलाठ्यांमार्फत सूचना देवून आधार कार्डचे अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी पुरवठा विभागात धावपळ सुरू असल्याचे चित्र पहायला मिळाले.
आधार संलग्निकरण अजूनही मंदच
By admin | Updated: December 15, 2015 23:30 IST