शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाचा सहायक अधीक्षक लाचेच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:04 IST

५०० रुपयांची लाच घेताना पाचोड (ता.पैठण) येथील आरोग्य विभागाच्या सहायक अधीक्षकाला लाचलुचपत प्र्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गैरहजर चार दिवसांच्या कालावधीचे कपात झालेले वेतन काढून देण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना पाचोड (ता.पैठण) येथील आरोग्य विभागाच्या सहायक अधीक्षकाला लाचलुचपत प्र्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई पाचोड येथे ग्राामीण रुग्णालयाच्या लेखा शाखेत २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. विशेष म्हणजे आरोपीच्या सेवानिवृत्तीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले आहेत.अनिल गोपीनाथ लोखंडे (५७, रा. पाचोड) असे अटक करण्यात आलेल्या सहायक अधीक्षकाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, तक्रारदार आणि आरोपी हे पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत आहेत. तक्रारदार हे १५ ते १७ मार्च या कालावधीत प्रशिक्षणासाठी हजर होते. असे असताना चार दिवसांची गैरहजेरी लावून त्यांचे वेतन कापण्यात आले होते. यामुळे प्रशिक्षणासाठी कर्तव्यावर हजर असल्याने चार दिवसांच्या कालावधीतील वेतन काढून द्यावे, अशी विनंती त्यांनी सहायक अधीक्षक लोखंडे यांना भेटून केली. तेव्हा आरोपींनी त्यांना पाचशे रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यानंतर साध्या वेशातील पोलीस अधिकारी, कर्मचाºयांनी पाचोड येथे जाऊन २२ सप्टेंबर रोजी दोन पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आरोपीच्या कार्यालयाच्या परिसरातच सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेचे पाचशे रुपये घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी लोखंडे यास रंगेहात पकडले. हा सापळा अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक किशोर चौधरी, पोलीस निरीक्षक विकास पाटील, वैशाली पवार, पोहेकॉ राजपूत, गणेश पंडुरे, रवींद्र देशमुख, संतोष जोशी यांनी केली.