शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रकौशल्याच्या शिक्षणातून घडविले ‘सुपर ट्वेंटी टू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 05:32 IST

आयआयटीचे द्वार खुले करून देणाऱ्या ‘सुपर थर्टी’ या चित्रपटाप्रमाणेच औरंगाबादेत ‘सुपर टट्वेंटी टू’ तरुण तंत्रकौशल्याच्या आधारे रोजगार मिळवू लागले आहेत

औरंगाबाद : सामान्य विद्यार्थ्यांना आयआयटीचे द्वार खुले करून देणाऱ्या ‘सुपर थर्टी’ या चित्रपटाप्रमाणेच औरंगाबादेत ‘सुपर टट्वेंटी टू’ तरुण तंत्रकौशल्याच्या आधारे रोजगार मिळवू लागले आहेत. परिस्थितीशी दोन हात करीत पुढे आलेल्या २२ पोलीस पाल्यांना तीन महिन्यांच्या तंत्रशिक्षण प्रशिक्षणामुळे रोजगार मिळाला आहे. औद्योगिक संघटनांनी पुढाकार घेऊन प्रथमच हा प्रयोग मोफत प्रशिक्षण देऊन यशस्वी केला आहे. येथील चेम्बर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआयए), पोलीस वेल्फेअर विभाग, मराठवाडा इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), जीआयझेड या संस्थांनी सामंजस्य कराराच्या माध्यमातून ही किमया साधाली आहे.पारंपरिक शिक्षण घेतलेले व शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडलेले २२ पोलीस पाल्य सीएमआयएच्या स्किल हब आणि सोबतच्या संस्थांनी निवडले. यात पाच मुलींचा समावेश आहे. त्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण देत सीएमआयएने त्यांना तांत्रिक ज्ञान अवगत करून दिले. अभ्यासक्रम पूर्ण करून मार्च २०२० मध्ये मिळणाºया प्रमाणपत्राच्या आधारावर हे विद्यार्थी भारतासह परदेशातही नोकरीस पात्र ठरू शकतील. वाळूजच्या मनीष इंजिनिअरिंग आणि पवन इंजिनिअरिंग या कंपन्यांनी या विद्यार्थ्यांना चार महिन्यांपूर्वी प्रशिक्षणार्थी रोजगार दिला. सीएनसीसारखी महागडी यंत्रे चालविण्यात या मुलांचे हात आज पारंगत झाले आहेत.>एम.ए., डी.एड.चे शिक्षण घेऊनही नोकरी नव्हती. त्यामुळे सीएनसी मशिनसंबंधीच्या अभ्यासक्रमाकडे वळलो. माझी उपजीविका भागविण्यासाठी मला यातून रोजागार मिळाला. - सचिन तुपे,औद्योगिक संस्थांनी केलेला पहिला प्रयोगशिक्षण देण्यासाठी तत्पर असलेल्या, आपल्या पाल्यांसाठी काही करू इच्छिणाºया संस्थांना एकत्र आणून हा प्रयोग केला. तांत्रिक कौशल्य हाती देऊन पोलीस पाल्यांना रोजगाराभिमुख करण्याचा हा कोणत्याही औद्योगिक संस्थेने केलेला पहिला प्रयोग आहे. उद्योगांना अपेक्षित मनुष्यबळ घडविण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. - आशिष गर्दे (माजी अध्यक्ष, सीएमआयए)