शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

मतदान टक्केवारी वाढीसाठी सुपर संडे

By admin | Updated: August 31, 2014 00:13 IST

नांदेड: मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सुपर संडे या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले़

नांदेड: मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी सुपर संडे या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले़ नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा शनिवारी डॉ़ शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित केली होती़ यावेळी ते बोलत होते़ कार्यशाळेस उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी, जिल्हा पुरवठा अधिकारी भागवत देशमुख, तहसीलदार महादेव किरवले यांची उपस्थिती होती़ स्वामी म्हणाले, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे मतदानाची टक्केवारी लक्षणीय वाढू शकते़ त्यामुळे मतदार जागृतीमध्ये सक्रिय सहभाग आवश्यक आहे़ दोन्ही मतदार -संघातील मतदानाच्या टक्केवारी आणि कामगिरीचे प्रतिबिंब जिल्ह्याच्या निवडणुकीत उमटत असते़ त्यामुळे या मतदारसंघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क आणि सक्रियपणे काम करणे अपेक्षित आहे़ मतदारांना मतदानासाठी जागृत करण्याचा प्रयत्न अनेक स्तरावरून करण्यात येत आहे़ पण लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेचा अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांकडून मतदार याद्यांची अद्ययावतीकरण आणि त्यातून मतदारांपर्यंत जागृती करून, मतदानाची टक्केवारीत वाढ करण्याची कार्यवाही अपेक्षित आहे़ त्यामुळे रविवारी ३१ आॅगस्ट रोजी भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार याद्यात नाव समाविष्ट करणे, किंवा फोटो नसेल तर फोटो तसेच अन्य नोंदी अद्ययावत करण्यासाठी सुपर संडेची संधी देण्यात येत आहे़ त्यामुळे हे अभियान प्रभावीपणे राबविणे अपेक्षित आहे़ दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी ३१ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील मतदान केंद्रनिहाय मतदार याद्यांतील आपल्या नावाची खात्री करून घेऊन, तपशील, फोटो याबाबत अद्ययावत करण्यासाठी सूपर संडे या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून या संधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)