शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
"कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
6
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
7
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
8
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
9
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
10
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
11
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
12
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
13
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
14
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
16
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
17
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
18
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
19
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
20
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव

स्मशानभूमीत घुमले सनईचे सूर...!

By admin | Updated: December 31, 2015 13:13 IST

संजय तिपाले , बीड आक्रोश, हुंदके आणि वेदनांचे उसासे अनुभवणाऱ्या स्मशानभूमीने मंगळवारी पहिल्यांदाच सनईचे सूर अनुभवले. निमित्त होते एका लग्नाचे. माणसाच्या आयुष्याला जेथे

संजय तिपाले , बीडआक्रोश, हुंदके आणि वेदनांचे उसासे अनुभवणाऱ्या स्मशानभूमीने मंगळवारी पहिल्यांदाच सनईचे सूर अनुभवले. निमित्त होते एका लग्नाचे. माणसाच्या आयुष्याला जेथे पूर्णविराम मिळतो तेथेच रेणुका गायकवाड आणि गंगाराम जाधव यांनी नव्या आयुष्याला सुरूवात केली.रेणुका व गंगाराम यांचे लग्न येथील अमरधाम स्मशानभूमीत रितीरिवाजाप्रमाणे थाटामाटात पार पडले. स्मशानभूमीत हा लग्नसोहळा पार पडला असला तरी तो एखाद्या मंगल कार्यालयातील लग्नसमारंभासारखाच होता. इतर वेळी स्मशानभूमीत पाऊल ठेवताना प्रत्येकजण दु:खी अंतकरणाने येतो; परंतु मंगळवारचे चित्र याहून वेगळेच होते. लक्ष्मण गायकवाड व पार्वती गायकवाड हे दाम्पत्य मागील दहा वर्षांपासून स्मशानभूमीत वास्तव्यास आहे. मूळचे औरंगाबाद येथील गायकवाड दाम्पत्यास एक मुलगी व दोन मुले आहेत. कन्या रेणुका ही उपवर झाल्याने तिच्यासाठी वर संशोधन सुरू झाले अन् हा शोध गंगाराम सूर्यभान जाधव (रा. शिरूर घोडनदी, जि. अहमदनगर) या तरूणाजवळ येऊन थांबला. मंगळवारचा मुहूर्त ठरला. रेणुका १० वी तर गंगाराम १२ वी उत्तीर्ण आहे. तो देखील आई-वडिलांसमवेत स्मशानभूमीतच राहतो.विवाह स्थळासाठी दोन्हीकडील मंडळींनी स्मशानभूमीलाच होकार दिला. त्यानुसार शामियाना उभारण्यापासून ते वऱ्हाडींच्या पंगतीपर्यंतची तयारी जोरदार झाली. वऱ्हाडींसाठी पुरीभाजी, जिलेबी, मसाला भात, भजे असा खास बेत होता. देवाब्राह्मणांच्या साक्षीने दुपारच्या मुहूर्तावर हा विवाहसोहळा पार पडला. यावेळी रेणुकाचे मामा चंदू इरेवार यांच्यासह लक्ष्मण घनसरवाड व इतर दिमतीला होते. नातेवाईकांसह २५० पाहुणे या सोहळ्याचे साक्षीदार ठरले.लग्नाचे वैशिष्ट्य म्हणजे गंगारामने हुंडा न घेता रेणुकाला आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून निवडले. वरपित्याने भांडीकुंडी व इतर संसारोपयोगी साहित्य दिले. नवरदेवाला आहेरही केला.४गंगारामने सांगितले की आमची अख्खी हयात स्मशानभूमीत जाते. त्यामुळे येथे लग्न केले त्यात आश्चर्य काय ? असा प्रश्न उपस्थित करून या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याचे समर्थन केले. विवाहास मोठ्या संख्येने वऱ्हाडी उपस्थित होती.