चालू वर्षातील सर्वाधिक नोंद : नागरिक होताहेत घामाघूमउस्मानाबाद : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. उष्णतेमुळे अबालवृद्ध बेजार होत आहेत. साधारणपणे मागील आठवडाभरापासून तापमानामध्ये सातत्याने वाढ होत आहेत. गुरूवारी तर चालू वर्षातील सर्वाधिक ४२.१ अंश सेल्सीअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. उष्माघातामुळे आजवर जिल्ह्यातील तीन जणांचा बळी गेला आहे.मार्च महिन्याअखेर कडाक्याच्या उन्हाची चाहूल गाली होती. एप्रिल महिना उजाडल्यानंतर तर तापमानामध्ये सातत्याने वाढ होवू लागली आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाचा पारा काहीअंशी घसरला होता. अवकाळी पाऊस थांबल्यानंतर पुन्हा उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. मागील पाच दिवसांपासून सातत्याने तापमानामध्ये वाढ होवू लागली आहे. गुरूवारी उस्मानाबाद शहराचे तापमान ४२.१ अंशावर पोहोंचले. त्यामुळे नियमितपणे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना चांगलेच चटके जाणवले. सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरूवात होत आहे. दुपारी १ ते २ या वेळेत पारा साधारणपणे चाळीशीवर जावून ठेपत आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत सूर्याच्या प्रकोपाची तीव्रता जाणवत आहे. उष्माघातामुळे मागील काही दिवसांत जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. (प्रतिनिधी)असे नोंदविले गेले तापमानतारीखतापमान१० एप्रिल४०.५११ एप्रिल ४०.६१२ एप्रिल ४१.२१३ एप्रिल ४०.६१४ एप्रिल४२.१(तापमान अंश सेल्शीअसमध्ये)अशी घ्या काळजी...वाढत्या उन्हामुळे होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी दिवसभर पांढऱ्या अथवा फिक्कट रंगाचे कपडे वापरावेत. शक्यतो उन्हात जाणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे. डोक्यावर टोपी किंवा रूमाल बांधवा. डोळ्यांसाठी गॉगल वापरावा. उन्हात फिरल्यानंतर लिंबूपाणी प्यावे. थंड पाण्याने अंग पुसावे. लहान मुले, वयोवृद्धांनी उन्हात जाणे टाळावे. उन्हामुळे काही त्रास झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत.
उन्हाचा पारा ४२ अंशावर !
By admin | Updated: April 15, 2016 00:48 IST