शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

विमा रक्कम कर्जात जमा

By admin | Updated: June 16, 2017 00:50 IST

पाटोदा : शेतकऱ्यांना पीक विम्याचे आलेले पैसे बँकांनी कर्जखाती वळती केले आहेत

विलास भोसले। लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : शेतकऱ्यांना पीक विम्याचे आलेले पैसे बँकांनी कर्जखाती वळती केले आहेत. बँकांनी अशी प्रक्रिया केल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे दहा कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. मागील वर्षी शासनाने पीक विम्याचे पैसे कर्जखाती वळती करू नयेत किंवा कपात करू नयेत असे आदेश दिले होते. यंदा शासनाने कर्जमाफी देऊ केल्याने विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्याची मागणी आहे.शेतकऱ्यांना पुरेसा दिलासा देण्याच्या उद्देशाने काही बदल करून पंतप्रधान पीकविमा योजना आखण्यात आली.यामध्ये कर्जदार शेतकरी आणि बिगर कर्जदार शेतकरी असे भाग पाडण्यात आले. पीक कर्ज घेणारा शेतकरी कर्जदार आणि न घेणारा शेतकरी बिगर कर्जदार अशी रचना करण्यात आलेली आहे.बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीकविमा भरणे ऐच्छिक करण्यात आले तर पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पिकविमा बंधनकारक करण्यात आला. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याचा पीक विमा बँकेने परस्पर भरणा करुन हप्त्याचे पैसे कर्जखाती टाकले. पीक विम्याच्या रकमा विमा कंपनीने बँकांकडे पाठवल्या. बँकानी हे पैसे शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात वळती केले. वास्तविक गतवर्षी विम्याचे पैसे कर्जात वसूल करु नयेत असे शासनाचे आदेश आहेत. तरीही बॅँका पीक विम्याची रक्कम कर्जखाती वळती करत आहेत. वसुलीबाबत आदेश असल्याचे बॅँक अधिकारी सांगतात. ही रक्कम वळती करु नये अशी मागणी होत आहे.