शिवाजीनगर भागात विजय वखरे आपल्या आई व भावासह राहतात. ते एका पतसंस्थेत पिग्मी कलेक्शन करीत असत. तर कधी कधी भावाच्या सलून दुकानात काम करीत असत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षांपासून आर्थिक स्थिती ढासळल्याने विजय वखरे हे तणावाखाली होते. यातच बुधवारी रात्री साडेआठ वाजता घरात त्यांनी गळफास घेतला. त्यांची भावजय घरी आल्यानंतर विजय हे दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी आरडाओरड केली. दरवाजा तोडल्यानंतर विजय वखरे यांनी गळफास घेतल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळताच पाचोड ठाण्याचे सपोनि. गणेश सुरवसे, जमादार सुधाकर मोहिते यांनी धाव घेत विजय वखरे यांना ग्रामीण रुग्णालयात हलविले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीपान काळे यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाचोड येथे तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:03 IST