उस्मानाबाद : तालुक्यातील भानसगाव येथील एका २३ वर्षीय महिलेने सोनेगाव शिवारातील एका विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली़ ही घटना रविवारी सकाळी घडली असून, या प्रकरणी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, भानसगाव येथील मधुमती गणपत सुतार (वय-२३) ही महिला रविवारी सकाळी घरातून बाहेर जात असल्याचे सांगून गेली होती़ मात्र, ती घरी लवकर परत न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली असता सोनेगाव शिवारातील मोरे यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला़ या प्रकरणी सतीश सुतार यांनी दिलेल्या माहितीवरून उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार जाधव हे करीत आहेत़ दरम्यान, मधुमती सुतार यांनी आत्महत्या कोणत्या कारणाने केली याची माहिती अद्याप समोर आली नसून, तपासाअंती आत्महत्ये मागचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले़ या घटनेमुळे सोनेगाव व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे़ (प्रतिनिधी)
सोनेगावात महिलेची आत्महत्या
By admin | Updated: April 13, 2015 00:47 IST