लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक किशोर नारायण पाराशर (४३) यांनी घरातील पंख्याला नायलॉन दोरीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना एमआयडीसी परिसरातील उत्तरानगरीमधील त्यांच्या राहत्या घरात मंगळवारी घडली.किशोर पाराशर हे सकाळी कामावर जातो असे सांगून घराबाहेर पडले; परंतु ते कार्यालयात गेले नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना फोन लावून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी फोन न घेतल्यामुळे नातेवाईकांनी शोध सुरू केला. फोनचे लोकेशन हडको व कार्यालय, असे दाखवीत असल्याने हा परिसर त्यांचे भाचे व पत्नीने धुंडाळून काढला. दुपारी मुलगी ऋतिका शाळेतून आली. दरवाजा बंद असल्याने ती घराबाहेरच बसली. शेजारच्यांनी सांगितले, तुझे वडील घरी आले आहेत. तेव्हा तिने दाराची कडी व बेल वाजविली. दरवाजा आतून बंद होता. तो बराच वेळ उघडला नाही. अखेर शेजाºयांनी दरवाजा तोडला.नायलॉनच्या दोरीने घेतला गळफासदरवाजा तोडून जेव्हा नातेवाईक व नागरिक घरात शिरले तेव्हा भयानक चित्र पाहून शाळकरी मुलगी धायमोकलून रडू लागली. किशोर पाराशर यांनी बेडवर लोखंडी खुर्ची ठेवून छताच्या पंख्याला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतला होता. मुख्य दरवाजा बंद होता. मोबाईल जवळच ठेवलेला होता.
शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लिपिकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:31 IST