शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:08 IST

एका विशेष लेखापरीक्षकाने स्वत:च्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची थरारक घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास शिवाजीनगर भागातील बिंदेगिरी अपार्टमेंटमध्ये घडली. सुधाकर अभिमन्यू मुंढे (४७), असे गोळी झाडून आत्महत्या केलेल्या विशेष लेखापरीक्षकाचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एका विशेष लेखापरीक्षकाने स्वत:च्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची थरारक घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास शिवाजीनगर भागातील बिंदेगिरी अपार्टमेंटमध्ये घडली. सुधाकर अभिमन्यू मुंढे (४७), असे गोळी झाडून आत्महत्या केलेल्या विशेष लेखापरीक्षकाचे नाव आहे.सकाळी मुंढे हॉलमध्ये होते. त्यांची पत्नी पाणी भरत होती, तर मुलगी स्वयंपाकघरात काम करीत होती. त्याचदरम्यान मुंढे यांनी त्यांचे खासगी पिस्तूल काढून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली. गोळी डोक्याच्या आरपार जाऊन १० फूट दूर भिंतीवर आदळली. दरम्यान, जोराचा आवाज झाल्याने कुटुंबीय हॉलमध्ये धावत आले. मुंढे (पान २ वर)पत्नीने विचारल्यानंतरही त्यांनी उत्तर दिले नाहीमुंढे यांना एक मुलगी आणि दोन मुले आहेत. त्यांचा लहान मुलगा ८ वर्षांचा असून, विराज हा शाळेत तिसरीत शिकत आहे. शुक्रवारी तो शाळेला जाण्यासाठी वडिलांसोबत गेला होता. बसदेखील आली. मात्र, मुंढे यांनी विराजला शाळेच्या बसमध्ये न सोडता परत घरी आणले.विराज घरी आल्याचे पाहून पत्नीने मुंढे यांना त्यास शाळेत का पाठवले नाही, अशी विचारणा केली असता काहीही उत्तर न देता ते हॉलमध्ये गेले व काही वेळातच त्यांच्या खुर्चीवर बसून त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली.आत्महत्येचे कारणउद्याप गुलदस्त्यातमुंढे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या का केली, कार्यालयात काही टेन्शन होते काय, कुणाशी अनबन किंवा घरगुती कारण या सर्व दिशेने पोलीस तपास करीत आहेत.