शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वैजापुरातील डॉक्टरची गोळी झाडून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:34 IST

वैजापूर शहरामधील एका खाजगी रुग्णालयातील ३० वर्षीय अविवाहित डॉक्टरने घरातच स्वत:वर गावठी पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. फुलेवाडी रस्त्यावरील शिक्षक कॉलनीत हा प्रकार घडला. संजयकुमार ऊर्फ यश विनोद टेंभरे (रा. गोंदिया, ह.मु. वैजापूर), असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ठळक मुद्देखळबळ : घरात एकटेच असताना संपविली जीवनयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : वैजापूर शहरामधील एका खाजगी रुग्णालयातील ३० वर्षीय अविवाहित डॉक्टरने घरातच स्वत:वर गावठी पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. फुलेवाडी रस्त्यावरील शिक्षक कॉलनीत हा प्रकार घडला. संजयकुमार ऊर्फ यश विनोद टेंभरे (रा. गोंदिया, ह.मु. वैजापूर), असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.वैजापूर शहरातील आनंद हॉस्पिटलमध्ये गेल्या चार वर्षांपासून बालरोगतज्ज्ञ या पदावर डॉ. संजयकुमार टेंभरे कार्यरत होते. आनंद हॉस्पिटलसमोरील शिक्षक कॉलनीत दुसºया मजल्यावर ते भाड्याच्या खोलीत एकटेच राहतात. शुक्रवारी त्यांनी दुपारी १२ वाजेपर्यंत रुग्णालयात ड्यूटी करून निवासस्थान गाठले. दुपारी १ ते २ वाजेदरम्यान त्यांनी स्वत:कडील गावठी पिस्तुलातून डाव्या हाताने हृदयावर एक गोळी झाडून घेतली.दरम्यान, रुग्णालय व्यवस्थापनाने दुपारी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी डॉ. टेंभरे यांना बोलाविण्यासाठी मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉ. टेंभरे यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने रुग्णालयाचा सुरक्षारक्षक त्यांना बोलाविण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचला. त्यावेळी निवासस्थानाचा दरवाजा आतून बंद होता. आवाज देऊनही आतून दरवाजा उघडला जात नसल्यामुळे सुरक्षारक्षकाला संशय आल्याने त्याने ही बाब रुग्णालय व्यवस्थापनाला कळविली. त्यानंतर निवासस्थानाचा दरवाजा तोडल्यानंतर पलंगावर डॉ. संजयकुमार रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आले. गोळी झाडल्याचा आवाज येऊ नये म्हणून त्यांनी टी.व्ही.चा आवाज मोठा केला होता. या प्रकाराची माहिती पोलिसांना कळवताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, सहायक पोलीस निरीक्षक रामहरी जाधव, सहायक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग बहुरे, संजय घुगे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.डॉक्टरकडे पिस्तूल कसे ?४आत्महत्या केलेल्या डॉक्टरकडे पिस्तूल व चार ते पाच काडतुसे बघून पोलीसही चक्रावले आहेत. डॉ. संजयकुमार हे मूळचे गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पिस्तूल कसे आले, या दृष्टिकोनातूनही पोलीस तपास करीत आहेत.प्रेम प्रकरणातून आत्महत्या?४दवाखान्यातील काही कर्मचारीव परिसरातील नागरिकांच्यामते डॉक्टर अविवाहित असून, त्यांनी प्रेम प्रकरणातून आत्महत्या केली असावी.