शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

रांजणगावात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:29 IST

वाळूज महानगर : एका २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.१३) रात्री ...

वाळूज महानगर : एका २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.१३) रात्री ८ वाजेच्या सुमारास रांजणगावात घडली.

याविषयी अधिक माहिती अशी की, अर्चना मारूती वाबळे (२५) ही पती व दोन मुलासह रांजणगावात वास्तव्यास आहे. रविवारी (दि.१३) रात्री ८ वाजेच्या सुमारास अर्चना हिने राहत्या घरी छताच्या लोखंडी ॲंगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. अर्चना हिने गळफास घेतल्याचे लक्षात येताच बाळासाहेब तुरकणे व आकाश तुरकणे या दोघा पिता-पुत्रांनी अर्चना हिस बेशुद्ध अवस्थेत पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून अर्चना वाबळे हिस रात्री १० वाजेच्या सुमारास मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास उपनिरीक्षक चेतन ओगले हे करीत आहेत.

------------------------

प्रवासी भरण्यावर चालक आपसात भिडले

वाद विकोपाला : ए.एस.क्लब चौकातील घटना

वाळूज महानगर : खासगी वाहनात प्रवासी भरण्यावर दोन चालक आपसात भिडल्याची घटना रविवारी (दि.१३) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास ए.एस.क्लब चौकात घडली. या घटनेत सुशील प्रकाश लोखंडे (३४ रा.तिसगाव परिसर) हा जखमी झाला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, सुशील प्रकाश लोखंडे हा रविवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास आपली टाटा मॅजिक (एम.एच.२०, ए.वाय.५८९४) घेऊन ए.एस.क़लब चौकात उभी करुन प्रवासी भरत होता. यावेळी अ‍ॅपेरिक्षाचा (एम.एच.२०, इ.एफ.८२०४) चालक रतन सौदागर याने सुशील याच्या वाहनातील प्रवासी खाली उतरवून आपल्या रिक्षात बसवू लागला. हा प्रकार पाहताच सुशील याने त्यास मज्जाव केल्यामुळे रतन सौदागर याने त्यास शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरूवात केली. या दोघातील वाद विकोपाला गेल्याने संतप्त झालेल्या रतन याने रस्त्यावरील दगड फेकून मारल्यामुळे सुशील याचे डोके फुटून तो जखमी झाला. या दोघात सुरु असलेल्या भांडणाचा आवाज ऐकून चौकात उभ्या असलेल्या अनिल गाडे, संतोष काळे व चंदू जोगदंड यांनी मध्यस्थी करुन रतन याच्या तावडीतून सुशील याची सुटका केली. या मारहाण प्रकरणी सुशील लोखंडे याच्या तक्रारीवरुन रतन सौदागर याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------