बीड : शहरात २४ तासांत दोन आत्महत्या झाल्या. शिक्षक कॉलनी व नाट्यगृह परिसरात या घटना घडल्या.अशोक आश्रुबा उनवणे (वय ३५, रा. शाहूनगर) हे समाजकल्याण विभागातील पतसंस्थेत लिपिक पदावर कार्यरत होते. शनिवारी सकाळी ६ वाजता घराबाहेर पडले. शिक्षक कॉलनीतील पतसंस्थेच्या कार्यालयात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. कारण गुलदस्त्यात आहे. तसेच गणपत तुकाराम दातखीळ (वय ५५, रा. सैदापूर, ता. गेवराई ह.मु.नाट्यगृह रोड, बीड) यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन जीवनयात्रा संपविली. (प्रतिनिधी)
बीडमध्ये दोघांची आत्महत्या
By admin | Updated: July 3, 2016 00:38 IST