शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

लग्न होईना म्हणून आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: March 15, 2016 00:42 IST

औरंगाबाद : सव्वादोन वर्षांपूर्वी ज्या मुलीशी साखरपुडा झाला तिच्याशी अद्यापपर्यंत लग्न न झाल्यामुळे आणि आता नातेवाईकांनी तिचा

औरंगाबाद : सव्वादोन वर्षांपूर्वी ज्या मुलीशी साखरपुडा झाला तिच्याशी अद्यापपर्यंत लग्न न झाल्यामुळे आणि आता नातेवाईकांनी तिचा दुसरीकडे पुन्हा साखरपुडा केल्यामुळे लग्नाची आशा मावळलेल्या एका भावी नवरदेवाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे यांच्या कार्यालयात सोमवारी सकाळी ११ वाजता घडला. विष प्राशन केलेल्या तरुणावर घाटीत उपचार सुरू आहेत.मनीषसिंग यमुनासिंग राजपूत (२८, मूळ रा. गोरखपूर, उत्तरप्रदेश, ह.मु. कोहिनूर पार्क, तीसगाव) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो गुत्तेदारीची कामे करतो. याबाबत क्रांतीचौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी सांगितले की, मनीषसिंग याचा लासूर स्टेशन येथील विजयमाला (नाव बदललेले आहे) हिच्याशी १८ नोव्हेंबर २०१३ रोजी साखरपुडा झाला होता. दरम्यान, साखरपुड्यात दागिने करण्यासाठी आणि नंतर थोडे-थोडे करून विजयमालाच्या घरच्यांनी मनीषसिंग याच्याकडून २ लाख ४३ हजार रुपये घेतले. आता मात्र २ मार्च २०१६ रोजी विजयमालाच्या नातेवाईकांनी तिचा साखरपुडा दुसऱ्या तरुणाशी करून दिला. त्यामुळे पैसेही गेले आणि लग्नही होत नाही, असे समजून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ३ मार्च रोजी मनीषसिंग याने स्पीड पोस्टाने शिल्लेगाव पोलिसांत तक्रार केली.या तक्रारीनंतर पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे आणि त्यालाही चौकशीला न बोलावल्यामुळे रागाच्या भरात त्याने सोमवारी सकाळी विष प्राशन केले. तक्रार अर्जासह तो थेट विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे यांच्या कार्यालयात आला. तेथील पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधत असतानाच त्याला चक्कर आली. तो जमिनीवर पडल्यावर त्याने विष प्राशन केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला रिक्षातून तात्काळ घाटीत दाखल केले. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. याबाबत क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मनीषसिंग याने केलेली तक्रार १० मार्च रोजी प्राप्त झाली आहे. सोमवारी त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले. त्यावरून संबंधित मुलीच्या नातेवाईकांचा जबाब घेण्यात आला असून, मनीषसिंग याचा साखरपुडा झालेला नाही. ४संबंधित मुलीचे लग्न तुझ्याशीच लावून देऊ, असे सांगून मुलीच्या एका नातेवाईकाने त्याच्याकडून पैसे घेतले होते. मात्र, त्या नातेवाईक महिलेचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यानंतर इतरांना मनीषसिंग याने लग्नाबाबत विचारले तर त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे मनीषने हे कृत्य केल्याचे शिल्लेगाव ठाण्याचे सहायक निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सांगितले.