सेनगाव : नव्याने रूजू झालेले जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी बुधवारी सेनगाव तहसील कार्यालयाला अचानक भेट देऊन कार्यालयीन कामकाजाच्या पर्यायी व्यवस्थेची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या समस्या व तक्रारीही ऐकून घेतल्या. कासार यांनी हिंगोलीत रूजू झाल्यानंतर बुधवारी सकाळी १०.३० वाजता येथील तहसील कार्यालयास पहिल्यांदाच भेट दिली. महसूल कर्मचारी संपावर असल्यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प झाले आहे. नागरिकांची गैरसोय होत असल्याने कासार यांनी कार्यालयीन कामकाजाच्या पर्यायी व्यवस्थेची माहिती घेत कामाचा आढावा घेतला. दुपारी दीड वाजेपर्यंत कासार कार्यालयात बसून होते. अनेक नागरिकांच्या तक्रारी, निवेदनही स्वीकारले. मंडळ अधिकाऱ्यांची फिरकीबुधवारी सेनगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले नूतन जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी सेनगाव तहसील कार्यालयात आल्यानंतर सेनगाव येथील मंडळ अधिकारी घुगे यांची फोनवरून चांगलीच फिरकी घेतली. जिल्हाधिकारी कासार यांनी एका मंडळ अधिकाऱ्याला सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे फोन लावून साहेब, तुम्ही कुठे आहात? तुमच्याशी काम असून भेटायचे आहे, असा संवाद साधला. हिंगोलीवरून ये-जा करणारे मंडळ अधिकारी यांनीही बेफिकीरपणे संवाद साधत दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत सेनगावला येतो, असे त्यांना फोनवर सांगितले. सदर मंडळ अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. (वार्ताहर)हिंगोलीत नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी बुधवारी अचानक सेनगाव दौरा काढला.प्रशासनातील बहुतांश अधिकाऱ्यांनाही या दौऱ्याची माहिती नव्हती.सेनगाव येथे सकाळी १०.३० वाजताच जिल्हाधिकारी तहसील कार्यालयात दाखल झाले.
जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट
By admin | Updated: August 7, 2014 00:16 IST