बीड : जिल्हा परिषदेची सत्तासूत्रे कायमच मंत्री- आमदारांच्या कुटुंबियांभोवती फिरत असतात. भाजपकडे सत्ता गेल्यानंतरही ही परंपरा काही खंडित झाली नाही. युद्धजित पंडित व शोभा दरेकर यांची सभापतीपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सत्तेच्या केंद्रस्थानी मातब्बर नेत्यांचे वारसदार पहावयास मिळत आहेत.यापूर्वी जि. प. वर राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. अध्यक्षपदाची धुरा माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचे पुत्र विजयसिंह पंडित यांच्याकडे होती. माजी खा. केशरबाई क्षीरसागर यांचे नाते व आ. जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर हे पाच वर्षे सभापती राहिले.भाजपकडे सत्ता आल्यानंतरही ही परंपरा कायम राहिली असून नवनिर्वाचित सभातपींपैकी युद्धजित पंडित हे माजी मंत्री बदामराव पंडित यांचे पुत्र तर शोभा दरेकर या माजी आ. साहेबराव दरेकर यांच्या स्रुषा आहेत. युद्धजित पंडित यापूर्वीही सभापती होते. त्यांनी कृषी व पशुसंवर्धन खात्याचा कारभार पाहिला होता. त्यामुळे त्यांच्या पाठिशी अनुभव आहे. उर्वरितांपैकी राजेसाहेब देशमुख, संतोष हंगे, व शोभा दरेकर या तिघांनाही पहिल्यांदाच सभापती म्हणून संधी मिळाली आहे. (प्रतिनिधी)
वारसदारांचा रुबाब कायम
By admin | Updated: April 2, 2017 00:07 IST