शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

२ ते ९ जूनदरम्यानच्या म्युकरमायकोसिस रुग्णांची माहिती सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:02 IST

औरंगाबाद : २ ते ९ जून २०२१ दरम्यान म्युकरमायकोसिसच्या किती रुग्णांवर उपचार करण्यात आले, किती रुग्ण बरे झाले, किती ...

औरंगाबाद : २ ते ९ जून २०२१ दरम्यान म्युकरमायकोसिसच्या किती रुग्णांवर उपचार करण्यात आले, किती रुग्ण बरे झाले, किती रुग्णांचा मृत्यू झाला. या रुग्णांच्या उपचारासाठी दररोज किती इंजेक्शनचा पुरवठा झाला, याची जिल्हावार माहिती पुढील सुनावणी वेळी म्हणजेच १० जून रोजी सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या .रवींद्र घुगे आणि न्या .बी.यू. देबडवार यांनी बुधवारी मुख्य सरकारी वकिलांना दिले .

सुनावणीवेळी केंद्र शासनातर्फे असिस्टंट सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी खंडपीठास सांगितले की, केंद्र शासनाने ११ ते ३१ मे दरम्यान महाराष्ट्राला म्युकरमायकोसिसचे ६८,३६० व्हायल इंजेक्शन्स दिले आहेत. देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र , कर्नाटक आणि गुजरातमध्ये म्युकरमायकोसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असल्याचे त्यांनी सांगितले. इंजेक्शनची निर्मिती वाढविण्याचे निर्देश संबंधित कंपनीला दिले असून, येत्या २० ते २५ दिवसात इंजेक्शन निर्मिती वाढेल , अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली . सध्याच्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसह हैदराबाद येथील हाफकीन आणि एका कंपनीला परवाना दिला आहे. मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या मुख्य पीठापुढे म्युकरमायकोसिस संदर्भात ८ जूनला सुनावणी होणार आहे, असे त्यांनी मुंबईहून ऑनलाईन खंडपीठाला सांगितले . त्यामुळे औरंगाबाद खंडपीठात १० जूनला पुढील सुनावणी होणार आहे . न्यायालयाचे मित्र ॲड. सत्यजित बोरा यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की , प्रत्येक रुग्णाला दररोज ४ ते ५ इंजेक्शनची आवश्यकता असताना केवळ एक अथवा दोन इंजेक्शन दिले जात आहेत. आवश्यकतेपेक्षा ७० टक्के कमी पुरवठा केला गेला . अपूर्ण पुरवठ्यामुळे मराठवाड्यातील रुग्णांवर पुरेसे उपचार केले जात नाहीत. परिणामी १२४ रुग्णांचा मृत्यू झाला, याकडे त्यांनी खंडपीठाचे लक्ष वेधले .

चौकट

केवळ ३० टक्केच पुरवठा ; खंडपीठाची चिंता आणि नाराजी

मागील २० दिवसांपासून म्युकरमायकोसिसच्या ६६९ रुग्णांवर उपचार चालू असून , ३८५ रुग्ण बरे झाले आणि १२४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्य सरकारी वकील डी.आर. काळे यांनी खंडपीठास दिली. मराठवाड्याला ५०१७५ व्हायल्सची आवश्यकता असताना १६ ते ३० मे दरम्यान केवळ १३४२८ व्हायल्स म्हणजे आवश्यकतेच्या केवळ ३० टक्के इंजेक्शनचा पुरवठा झाला असल्याचे आजच्या सुनावणीत स्पष्ट झाले .त्यामुळे रुग्णांबद्दल चिंता व्यक्त करून इंजेक्शनच्या अपूर्ण पुरवठ्याबद्दल विशेष खंडपीठाने नाराजी व्यक्त केली .