शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

तीन तहसीलकडून तलाठ्यांचे वेळापत्रक दाखल

By admin | Updated: July 5, 2014 00:46 IST

हिंगोली : जिल्ह्यातील कामचुकार तलाठ्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळली नसली तरी सेनगाव, हिंगोली, वसमत तहसीलदारांनी त्यांच्या तालुक्यातील तलाठ्यांच्या व मंडळ अधिकाऱ्यांच्या गावनिहाय भेटीचे वेळापत्रक

हिंगोली : जिल्ह्यातील कामचुकार तलाठ्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळली नसली तरी सेनगाव, हिंगोली, वसमत तहसीलदारांनी त्यांच्या तालुक्यातील तलाठ्यांच्या व मंडळ अधिकाऱ्यांच्या गावनिहाय भेटीचे वेळापत्रक जिल्हाधिकाऱ्यांकडे शुक्रवारी सादर केले. ‘लोकमत’ ने यासंदर्भात नोकरशाहीचे वाभाडे काढणारे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महसूल प्रशासन हलले, हे विशेष! असे असले तरी कळमनुरी व औंढा नागनाथ तहसीलदारांनी मात्र वेळापत्रक किंवा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सायंकाळपर्यंत सादर केला नव्हता. ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना व शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना तलाठ्यांकडून घेण्यात येणाऱ्या विविध प्रमाणपत्रांसाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. महिनोमहिने तलाठी नियुक्त सज्जाच्या ठिकाणी जात नसल्याचे तसेच अनेक तलाठी नांदेड, परभणी, अकोला, हिंगोली या शहराच्या ठिकाणी राहून तसेच तालुक्याच्या ठिकाणी राहून कारभार पाहत असल्याचे ‘लोकमत’ च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये स्पष्ट झाले होते. या स्टिंग आॅपरेशनचे शेतकरी व विद्यार्थ्यांनी जोरदार स्वागत केले. दुसरीकडे कामचुकार तलाठ्यांचे पितळ उघडे पडले. जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून गेल्या १५ वर्षांत बहुतांश तलाठ्यांनी त्यांच्या गावभेटीचे वेळापत्रकच तयार केले नव्हते. मनाला वाटेल त्या वेळी ते गावामध्ये जायचे. दोन ते तीन महिने तलाठीच गावामध्ये येत नसल्याने ग्रामस्थांची अडवणूक होत होती. ही बाब समोर आल्यानंतर पहिल्यांदाच ‘लोकमत’ च्या दणक्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पाचही तहसीलदारांना व तिन्ही उपविभागीय अधिकाऱ्यांना कामचुकार तलाठ्यांवर कारवाई करण्याचे तसेच तलाठ्यांच्या गाव भेटीचे वेळापत्रक तयार करून सादर करण्याचे आदेश २७ जून रोजी दिले होते. तब्बल आठ दिवसानंतरही जिल्हाधिकाऱ्यांच्या या पत्राला एकाही अधिकाऱ्याने दाद दिली नसल्याचे वृत्त ४ जुलै रोजी ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध होताच सकाळी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांना मोबाईलवरून खडसावले. त्यानंतर सायंकाळपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वसमत, सेनगाव व हिंगोली तहसीलदारांनी त्यांच्या तालुक्यातील तलाठ्यांच्या गाव भेटीचे वेळापत्रक सादर केले. कळमनुरी व औंढा नागनाथ तहसीलदाराने मात्र सायंकाळी ५ वाजेपर्यंत असे वेळापत्रक सादर केले नव्हते. त्यामुळे हे तहसीलदार अद्यापही झोपेतच आहेत की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. वेळापत्रक तयार झाल्यानंतर आता ग्रामस्थांना वेळेवर कागदपत्रे मिळावीत व त्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनीच कडक लेखी सूचना देणे आवश्यक आहे. (जिल्हा प्रतिनिधी)वेळापत्रक वेबसाईटवर टाकणार- पोयामजनतेच्या सोयीसाठी जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमधील तलाठ्यांच्या गाव भेटीचे वेळापत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर टाकण्यात येणार असून, निश्चित केलेल्या दिवशी संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी त्या गावामध्ये उपस्थित राहतो की नाही, याचीही पडताळणी महसूलच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम म्हणाले.