शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सुभाष झांबड यांना काँग्रेसतर्फे औरंगाबाद लोकसभेसाठी उमेदवारीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:22 IST

औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे विधान परिषदेचे सदस्य सुभाष झांबड यांचे काम चांगले असून, त्यांचा सर्व तालुक्यांमध्ये चांगला संपर्क आहे. ते जनतेत मिसळतात, जनतेचे प्रश्न समजावून घेतात व ते सोडविण्यासाठी झटतात. त्यामुळे औरंगाबाद लोकसभेची काँग्रेसची उमेदवारी त्यांना दिल्यास ते निश्चितपणे जिंकतील, अशा शब्दात आज येथे काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे व्यक्त केल्या.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांचे मत : अशोकराव चव्हाण यांनी जाणून घेतली तालुकावार मनोगते

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे विधान परिषदेचे सदस्य सुभाष झांबड यांचे काम चांगले असून, त्यांचा सर्व तालुक्यांमध्ये चांगला संपर्क आहे. ते जनतेत मिसळतात, जनतेचे प्रश्न समजावून घेतात व ते सोडविण्यासाठी झटतात. त्यामुळे औरंगाबाद लोकसभेची काँग्रेसची उमेदवारी त्यांना दिल्यास ते निश्चितपणे जिंकतील, अशा शब्दात आज येथे काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे व्यक्त केल्या.आज दुपारपासून स्वत: चव्हाण यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री, गंगापूर, पैठण, कन्नड, वैजापूर व सिल्लोड या विधानसभा मतदारसंघवार कार्यकर्त्यांची मनोगते जाणून घेतली. यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह प्रमुख पदाधिकाºयांची उपस्थिती होती. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार हे सूत्रसंचालन करीत होते व योग्य त्या सूचना देत होते. त्या- त्या तालुका काँग्रेसच्या अध्यक्षांनी अशोकराव यांचे स्वागत केले.फुलंब्रीपासून सुरुवात झाली. नंतर गंगापूर, कन्नड व पैठण, अशी चर्चा झाली. वैजापूर आणि सिल्लोड या दोन्ही तालुक्यांची एकत्रित बैठक झाली.निवडून येण्यासाठी काय केले पाहिजे, आज काँग्रेसची काय परिस्थिती आहे, या मुद्यांभोवती ही चर्चा फिरत होती. सिल्लोडची जागा अब्दुल सत्तार यांच्या रुपाने आजच निवडून आल्यात जमा आहे, असे सिल्लोडच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. तर वैजापूर व अन्य तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी सुभाष झांबड हे लोकसभेसाठी कसे योग्य उमेदवार राहतील, हे पटवून दिले.पैठणची चर्चा सुरू असताना अशोकराव हे पैठणचेच भूमिपुत्र आहेत. पैठणहून स्वत: त्यांनीच निवडणूक लढवावी, असे मत अब्दुल सत्तार यांनी नोंदविले. त्यावर अनिल पटेल उद्गारले, या प्रस्तावाला मी देऊ का पाठिंबा....! मग अशोकराव बोलते झाले, ‘माझं नांदेडला चांगलं चालू आहे. इकडे येण्याचा प्रश्नच नाही. फार तर मी पैठणचा अतिरिक्त आमदार आहे, असे समजा’. त्यावर सभागृहात एकच हंशा पिकला.ओबीसींवर अन्याय नकोपैठणचे बाबासाहेब पवार यांनी आरोप केला की, ओबीसीच्या जागेवर मूळ ओबीसींना डावलले जाते व जे कुणबी मराठा आहेत, त्यांना तिकिटे देऊन मूळ ओबीसींवर अन्याय केला जातो. या मताशी अशोकराव चव्हाण यांनी सहमती दर्शविली. भिकाजी आठवले यांनी विद्यमान जिल्हा अध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या दोघांमध्ये यावेळी शाब्दिक चकमकही झाली.