शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

उपकुलसचिव ईश्वर मंझा अटकेत;५ दिवस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 05:43 IST

नोकरीचे आमिष दाखवून ३ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. ईश्वरसिंग रायभान मंझा यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नोकरीचे आमिष दाखवून ३ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. ईश्वरसिंग रायभान मंझा (५१) यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. न्यायालयासमोर उभे केले असता २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.चिकलठाण (ता. कन्नड) येथील शेतकरी देवनाथ माणिक चव्हाण हे १२ वी उत्तीर्ण झालेला त्यांचा भाऊ विजय चव्हाण यास नोकरी लावण्याचा प्रयत्न करीत होते. नंदनवन कॉलनीतील सतीश इंगळे हा चव्हाणांचा मित्र आहे. इंगळेने चव्हाणला सांगितले की, जयश्री आंबेवाडीकर यांची ईश्वरसिंग मंझा यांच्याशी चांगली ओळख आहे. मंझानी अनेकांना नोक-या लावल्या आहेत. सप्टेंबर २०१५ला चव्हाण यांनी इंगळेसह आंबेवाडीकर यांची भेट घेतली. आंबेवाडीकर यांनी मंझा यांना फोन करून घरी बोलावले. विद्यापीठात सहायक कारकून म्हणून नोकरी लावण्यासाठी मंझाने ६ लाख रुपये मागितले. चव्हाण यांनी २५ आॅक्टोबर २०१५ला आंबेवाडीकर यांच्या घरी मंझा यांना ३ लाख रुपये दिले. उर्वरित ३ लाख रुपये आॅर्डर मिळाल्यानंतर देण्याचे ठरले होते.पैसे देऊन तीन महिने उलटल्यानंतरही नोकरी न लागल्याने चव्हाण त्रस्त झाले. त्यांनी मंझाकडे पैसे परत करण्याची मागणी केली. पाठपुराव्यानंतर मंझा यांनी ३ लाखाचा धनादेश चव्हाण यांना ११ जानेवारी २०१७ रोजी दिला, तो वठला नाही.धनादेश न वटल्याने चव्हाण यांनी पैशांची मागणी केली असता, ‘पैसे परत करणार नाही, तुला काय करायचे ते कर’, अशी अरेरावीची भाषा मंझा यांनी वापरली. चव्हाण यांनी अखेर छावणी पोलिसांकडे धाव घेतली. गुन्हा दाखल झाल्यानंतर मंझा यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. मंझा सध्या विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रात उपकुलसचिव असून, मंझा यांच्याकडून अधिक प्रकरण उघड होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी दिली.