शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रुग्णालयाचा भार सहा परिचारिकांवर

By admin | Updated: May 15, 2014 00:17 IST

उद्धव चाटे, गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात परिसेविका व परिचारिकांच्या जागा रिक्त असल्यामुळे ६ परिचारिकांवर रुग्णालयाचा कारभार चालत आहे.

 उद्धव चाटे, गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात परिसेविका व परिचारिकांच्या जागा रिक्त असल्यामुळे ६ परिचारिकांवर रुग्णालयाचा कारभार चालत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात तीन मोठे वार्ड आहेत. त्यात एक पुरूष कक्ष, एक स्त्री कक्ष व अपघात कक्ष तसेच कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया कक्ष, प्रसुती विभाग, नवजात शिशू कक्ष यांचा समावेश आहे. या सर्व वार्डात ६ परिचारिका असल्यामुळे एकावेळी फक्त एकच अधिपरिचारिका ड्युटीवर असते. या एकाच परिचारिकेला तीन वार्ड व प्रसूती विभागाचे कामकाज पहावे लागते. यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याने रुग्ण व नातेवाईकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिकांच्या रिक्त जागा भराव्यात व परिचारिकेवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करावा, अशी मागणी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. उपजिल्हा रुग्णालयातील परिसेविकांची रिक्त पदे खालीलप्रमाणे परिसेविका-२ , पुरूष कक्ष अधिपरिचारिका- ०४, स्त्री कक्ष-०४, अपघात विभाग- ०४, प्रसूतीपश्चात विभाग- ०४, शस्त्रक्रिया विभाग - ०४, बाह्यरुग्ण विभाग - ०२, प्रसूती विभाग व नवजात शिशू विभाग- ०४ अशी एकूण २७ अधिपरिचारिकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे आहेत त्या परिचारिकेवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्याने परिचारिकामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिकांची पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत. त्यामुळे शहर व ग्रामीण भागामधून येणार्‍या हजारो रुग्णांची गैरसोय होऊ लागली आहे. याचे सोयरसूतक संंबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांना नाही.