वडवणी: तालुक्यातील चिखलबीड येथे दहावी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे एका विद्याथ्याने आत्महत्या केली़ २४ जून रोजी दुपारी चार वाजता ही घटना घडली़अंगद बन्सी मुंडे (वय २० रा़ चिखलबीड ता़ वडवणी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे़ तो धारुर येथे आपल्या बहिणीकडे शिक्षणासाठी राहत होता़ मागील सहा वर्र्षांपासून तो विज्ञान विषयात अनुत्तीर्ण होत होता़ विज्ञान विषयात उत्तीर्ण होण्यासाठी त्याने आॅक्टोबर मधील परीक्षाही दिल्या; पण त्याला काही यश आले नाही़ त्यामुळे त्याला नैराश्याने ग्रासले होते़ अशातच २४ जून रोजी दुपारी चार वाजता त्याने टोकाचे पाऊल उचलले़ राहत्या घरी त्याने विषारी द्रव घेतले़ त्याला अंबाजोगाई येथील स्वारातीत उपचारासाठी भरती केले होते़ उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ रामा बन्सी मुंडे यांच्या माहितीवरुन वडवणी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ नागरगोजे तपास करत आहेत़ (वार्ताहर)
अनुत्तीर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्याची आत्महत्या
By admin | Updated: July 1, 2014 01:02 IST