शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

सीईओंच्या दालनात विद्यार्थ्यांची शाळा

By admin | Updated: June 18, 2014 01:25 IST

परभणी : तालुक्यातील माऊली शिक्षण संस्था बेलखेडा द्वारा संचलित कै़ किश्नराव आघाव माध्यमिक विद्यालय जांब बु़ या शाळेचे स्थलांतर करू नये,

परभणी : तालुक्यातील माऊली शिक्षण संस्था बेलखेडा द्वारा संचलित कै़ किश्नराव आघाव माध्यमिक विद्यालय जांब बु़ या शाळेचे स्थलांतर करू नये, या मागणीसाठी विद्यार्थी व पालकांनी सीईओंच्या दालनात शाळा भरविली़ ही घटना मंगळवारी दुपारी घडली़ यामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले़ जिंतूर तालुक्यातील जांब बु़ येथील कै़ किशनराव आघाव माध्यमिक विद्यालयाचे स्थलांतर झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़ हे स्थलांतर रद्द करावे, या मागणीसाठी पालक व विद्यार्थ्यांनी मंगळवारी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात शाळा भरविली़ त्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़ तसेच विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीने हा परिसर दणाणून गेला़ यावेळी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती़ तसेच जि़ प़ चे शिक्षणाधिकारी गिरी यांना निवेदन देण्यात आले़ या निवेदनावर नारायण आसाराम बुधवंत, शंकर बुधवंत, सुभाष मोरे, बालासाहेब हेंडगे, प्रभाकर चाटे, भारत राठोड, उत्तम जाधव, माधव जाधव, रवी जाधव, प्रमोद घुगे, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, बालाजी कऱ्हाळे, अनंता कदम, गणेश शेवाळे, बंडू आडे, अभिषेक राठोड, केशव राठोड, विश्वनाथ आडे, अरविंद जाधव, एकनाथ आडे, शंकर आडे, पवन गाडे, पांडुरंग जाधव, अजय मोहिते, प्रियंका बोडखे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत़ (प्रतिनिधी)गिरींना धरले धारेवरजांब बु़ येथील कै़ किशनराव आघाव माध्यमिक विद्यालयाचे स्थलांतर रद्द करावे, या मागणीसाठी पालकांनी शिक्षणाधिकारी आऱ बी़ गिरी यांना धारेवर धरले़ यावेळी राकाँचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांनीही गिरी यांना पालक व विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा केली़ यावेळी नानासाहेब राऊत, प्रसाद बुधवंत, सलीम काझी यांचीही उपस्थिती होती़ विजय भांबळे यांनी मध्यस्थी केल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले़