शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनो हार मानू नका, तोडगा निघतोच!

By admin | Updated: June 19, 2014 00:28 IST

जालना : विद्यार्थी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर मुलांची मानसिकता ओळखून त्यांना जीवनातील अडचणी, समस्यांवर मार्ग काढण्यासाठी सक्षम बनविण्याची गरज आहे.

जालना : विद्यार्थी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर मुलांची मानसिकता ओळखून त्यांना जीवनातील अडचणी, समस्यांवर मार्ग काढण्यासाठी सक्षम बनविण्याची गरज आहे. त्यासाठी पालकांनीच विद्यार्थ्यांना सर्व समस्यांवर तोडगा काढता येतो, हार मानू नका, याची जाणीव करून देण्याची गरज आहे. परीक्षेत नापास झालो म्हणून नैराश्यात जाने, खचून जाणे त्यातून आत्महत्येसारख्या घटना घडल्याचे आपण नेहमीच वाचतो, ऐकतो. परंतु मुलाला कमी मार्क मिळाले, नापास झाला तरी त्याची योग्य पद्धतीने पालकांनी समजूत काढणे गरजेचे आहे. इतर मुलांची आपल्या पाल्याशी तुलना करून आपल्या मुलांवर दबाव टाकणे हे अत्यंत घातक असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. एकमेकांशी तुलना :विद्यार्थ्यांच्या या मानसिकतेबद्दल व पालकांच्या आग्रही वृत्तीबद्दल मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कुमार सारस्वत, डॉ. आनंद अग्रवाल, प्रा. चंद्रकांत धोत्रे यांनी ‘लोकमत’शी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, विद्यार्थी टीव्हीवरील सिरीयल, चित्रपटातील विद्यार्थ्यांचे आदर्श जीवन पाहून त्याची स्वत:शी तुलना करतात. तसेच आपसातही एकमेकांशी तुलना करतात. अमूक विद्यार्थी हुशार आहे. त्याचे आईवडील मदत करतात, अशा स्वरूपाची तुलनाही करतात. न्यूनगंड तयार होतो:आईवडीलही मुलांना त्यांच्या बरोबरीच्या मुलांचे उदाहरण देऊन बघ त्याला कसे चांगले गुण मिळाले, वगैरे तुलना करतात. त्याचा विद्यार्थ्यांच्या मनावर विशेषत: मध्यमवर्गीय घरातील मुलांच्या मनावर विपरित परिणाम होऊन न्यूनगंड तयार होतो. त्यातच अशी मुले जर हळव्या मनाची असतील तर आत्महत्येकडे वळतात. जीवघेणी स्पर्धा :अनेकदा आपल्या शिक्षणासाठी खर्च करण्याची ऐपत आईवडिलांकडे नसल्याने ते अडचणीत आलेले पाहूनही मुलांना नैराश्य येते. त्यांना बँकेकडून शैक्षणिक कर्ज मिळू शकते. त्यामुळे आई-वडिलांवर शिक्षणाचा भार येत नाही, हे समजावून सांगितले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांना तसेच पालकांनाही वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेऊनच चांगले करिअर होऊ शकते असे नाही तर इतरही अनेक क्षेत्रात भरपूर पैसे कमावण्याची संधी आहे, हे बिंबविणेही गरजेचे आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली जीवघेणी स्पर्धा कमी होऊन मुलांच्या मनावरील ताण कमी होईल. मानसिक आजारही जडतात :अनेकदा मुलांना मानसिक आजारही जडतात. मात्र आईवडील ते मान्य करायला तयार होत नाहीत. भारतात या आजारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन दूषित आहे. सर्वसाधारण परिस्थितीत मुले आत्महत्येकडे वळत नाहीत. आजाराकडे दुर्लक्ष झाले तर खूपच नैराश्य येऊन ते आत्महत्येचे पाऊल उचलतात. त्यामुळे या आजारांबाबतही सामाजिक उद्बोधनाची गरज आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांशी मनमोकळा संवाद साधला पाहिजे. जरी मुले चुकली, तरीही त्यांना ती आपली मुले असल्याने त्यांच्यावर जीवापाड प्रेम असल्याची जाणीव पालकांनी त्यांना करून दिली पाहिजे. तसेच मुलांच्या वागणुकीत जर बदल जाणवला तर मुलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर मार्ग शोधला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या समस्यांचे त्वरित निराकरण झाले तर त्यांना नैराश्य येणार नाही व आत्महत्येसारखे पाऊल उचलणार नाहीत. (प्रतिनिधी)प्रत्येक विद्यार्थ्यांची क्षमता वेगळी असते. दहावीवर ती मापू नये. जगात अनेक व्यक्तींनी दहावी नसतानाही यशाचे शिखर पादाक्रांत केले आहे. पालकांनी दहावीच्या गुणांवर त्यांचा ग्रेड ठरवू नये. ४० टक्के पडले म्हणून त्याची क्षमता तेवढीच आहे, असे नसते. पालकांनी मुलांशी संवाद कायम राखला पाहिजे. जेणेकरून मुले त्यांच्या अडचणी मनमोकळेपणाने मांडू शकतील व आत्महत्येसारखे अतिरेकी पाऊल उचलणार नाही.-डॉ. कुमारश्री सारस्वत , मानसोपचार तज्ज्ञ.विद्यार्थ्यांवर पालक आपल्या अपेक्षेचे ओझे टाकतात. त्यांच्यावर दडपण येते. तसे न करता विद्यार्थ्यांना निर्णय घेऊ द्यायला पाहिजे. विद्यार्थ्यांचा भावनिक बुद्ध्यांक वाढविण्यासाठी पालक व शिक्षकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. स्पर्धेच्या युगात याकडे दुर्लक्ष होत आहे. फक्त शर्यतीवर भर देण्यात येतो. आपला पाल्य कसा अव्वल येईल याकडे सर्व पाहतात. मात्र सर्वकाही मार्कच आहे असे नाही. चांगले बोलणे व वागण्यातूनही यशस्वी होता येते.-डॉ.आनंद अग्रवाल, मानसोपचार तज्ज्ञ.जीवघेणी स्पर्धा, पालकांच्या वाढत्या अपेक्षा व विद्यार्थ्यांच्या मर्यादा यांचा कधी-कधी ताळमेळ बसत नाही. त्यामुळे मानसिक संघर्षातून विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य निर्माण होते. हे नैराश्य वाढले तर मुले आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयाकडे वळतात. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांची क्षमता ओळखूनच अभ्यासक्रम घेऊ द्यावा. जेणेकरून हा संघर्ष उद्भवण्याची वेळ येणार नाही. -प्रा. चंद्रकांत धोत्रे, (मानसशास्त्र विभाग) डॉ. बारवाले महाविद्यालय