शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

क्लासेसवाले, विद्यार्थी संघटनांचा वाद चिघळला

By admin | Updated: August 26, 2015 23:43 IST

बीड : खाजगी शिकवण्यांमधील सोयी-सुविधा आणि वाढीव शुल्काच्या विरोधात विद्यार्थी संघटनांनी आंदोलने केली होती. यावर क्लासेसवाल्यांनी खंडणीसाठी

बीड : खाजगी शिकवण्यांमधील सोयी-सुविधा आणि वाढीव शुल्काच्या विरोधात विद्यार्थी संघटनांनी आंदोलने केली होती. यावर क्लासेसवाल्यांनी खंडणीसाठी संघटना असे करीत असल्याचा आरोप केला होता. या आरोपावरून संघटना आक्रमक झाल्या आणि आरोप करणाऱ्या हनुमंत भोसले यांच्या तोंडाला बुधवारी शासकीय विश्रामगृहासमोर काळं फासले. यामुळे क्लासेसवाले, विद्यार्थी संघटनांचा वाद चांगलाच चिघळला आहे.खाजगी शिकवणीवाले अनाधिकृतपणे विद्यार्थ्यांकडून हजारो रूपये शुल्क आकारतात. एवढे शुल्क घेऊनही त्यांना योग्य त्या सुविधा देत नाहीत. मुलींची सुरक्षा, पिण्याचे पाणी, आसन व्यवस्था, अनुभवी शिक्षक, वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था नसते. अनेक क्लासेसवाले तर शुल्क भरलेल्या पावतीवर रजिस्टर नंबर नसतानाही हजारो रूपये सेवा कर आकारतात. या सर्व निर्णयांविरोधात मागील महिन्यापासून विद्यार्थी संघटनांचा लढा आहे. आंदोलने केली, मोर्चे काढले परंतु खासगी क्लासेसवाल्यांनी याला वेगळे वळण दिले. खंडणीसाठी विद्यार्थी संघटना असे प्रकार करीत असल्याचा आरोप हनुमंत भोसले यांनी केला होता. बुधवारी विद्यार्थी संघटनांनी या संदर्भात स्पष्टीकरण मागितले परंतु ते देता न आल्याने तू - तू मैं - मैं झाली. यातून वातावरण बिघडले. काही कार्यकर्त्यांनी भोसले यांच्या तोंडाला काळे फासून राग व्यक्त केला.‘त्या’ संघटनेचे नाव जाहीर कराक्लासेसवाल्यांकडे ज्या संघटनेने खंडणी मागितली त्यांचे नाव जाहीर करावे, असे खुले आव्हान विद्यार्थी संघटनांनी दिले आहे. सगळ्याच संघटनांना नाहक गोवू नये, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली.क्लासेवाल्यांची पोलिसांकडे धावभोसले यांच्या तोंडाला काळे फासल्यानंतर क्लासेसवाल्यांनी शिवाजीनगर ठाणे गाठून तक्रार दिली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता. (प्रतिनिधी)