शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

निराधार लाभार्थ्यांचा तहसीलमध्ये ठिय्या

By admin | Updated: May 26, 2017 00:36 IST

उमरगा : महाराष्ट्र ग्रामीण नियोजनशुन्य व मनमानी कारभारामुळे तालुक्यातील हजारो निराधारांचे मागील सहा महिन्यांपासून अनुदान वाटप करण्यात आलेले नाही़

लोकमत न्यूज नेटवर्कउमरगा : महाराष्ट्र ग्रामीण नियोजनशुन्य व मनमानी कारभारामुळे तालुक्यातील हजारो निराधारांचे मागील सहा महिन्यांपासून अनुदान वाटप करण्यात आलेले नाही़ तब्बल ३६ लाख रूपये अडकल्याने बँकेच्या निषेधार्थ शेकडो निराधारांनी गुरूवारी तहसील कार्यालयात ठिय्या मांडला होता़शासनाकडून तहसीलच्या विशेष सहाय्य योजना विभागामार्फत तालुक्यातील सर्वच राष्ट्रीय बँकेमार्फत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, अपंग, विधवा योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रवणबाळ राज्यसेवा निवृत्ती वेतन योजनेतील हजारो लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले जाते. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या उमरगा, तुरोरी, नाईचाकूर, आलूर, गुंजोटी या शाखांमार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या २५ गावातील निराधार योजनेतील २ हजार ३०३ लाभार्थ्यांचे गेल्या सहा महिन्यांचे ३६ लाख ७२ हजार ८०० रुपयांचे अनुदान वाटप झालेले नाही. शासन अनुदानाचे पैसे या बँकेला धनादेशद्वारे देते; मात्र या बँकेकडून धनादेश स्वीकारला जात नसून, तो गेल्या सहा महिन्यात तीनवेळेस परत केलेला आहे. ‘मनुष्यबळ कमी असल्याने हे अनुदान आॅनलाईन लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकावे, आम्ही पैसे वाटप करण्यास असमर्थ आहोत’ अशी भूमिका बँक घेत आहे़ त्यामुळे सहा महिन्यांपासून अनुदान वाटप रखडले आहे़ बोलणी करूनही बँक प्रशासन ऐकत नसल्याने तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते़ जिल्हाधिकारी यांनी संबंधित प्रशासनाला पैसे वाटप करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ मात्र, तरीही अनुदान वाटप होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे़गुंजोटी येथील शाखेत शेकडो निराधार सहा महिन्यांपासून चकरा मारत आहेत़ बँकेकडून पैसे सोडा चांगली वागणूकही मिळत नसल्याने गुरुवारी गुंजोटी, औराद, कदेर, मुरळी, औराद तांडा, कदेर तांडा येथील शेकडो महिला, पुरुष लाभार्थ्यांनी भरउन्हात तहसील कार्यालयापुढे ठिय्या मांडला होता़ तहसीलदार अरविंद बोळांगे यांनी येत्या दोन दिवसात हे अनुदान वाटप करण्याचे आश्वासन दिले़ यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे यांनीही बँकेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत पैसे वाटप करण्यासंबंधी विनंती केली़ मात्र, बँकेकडून कोणतेही आश्वासन दिले गेले नाही. बँकेच्या अडमुठी धोरणामुळे मात्र, शासनाच्या उद्देशाला हरताळ फासली जात असून, निराधारांचीही गैरसोय होत आहे़