गंगाधर तोगरे, कंधारगऊळ येथे १९८८ पासून अंशकालीन स्वच्छक म्हणून नियुक्ती झाली. अवघ्या ८० रुपये मानधनावर सेवा करण्यास प्रारंभ झाला. वाढत्या महागाईत सुद्धा आता १८०० रुपये तुटपुंज्या मानधनावर नामदेव भंडारे सेवा पुरवितात. अडीच दशकांपासून जगण्यासाठीचा संघर्ष चालू आहे. सेवेत कायम करुन अल्प मानधनात रुतलेला संसार बाहेर काढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी न्याय द्यावा, अशी आर्तहाक दिल्याचे समोर आले आहे. राज्यातील एकमेव लालकंधारी गोवसंवर्धन केंद्राचे गऊळ येथे १९८८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांनी उद्घाटन केले. लालकंधारी पशुधन इतर जातीच्या पशुधनापेक्षा वेगळे असल्याचे मान्यता मिळविण्यासाठी, या भागातील शेतकऱ्यांना शेतीचा जोडधंदा तेजीत आणण्यासाठी भाई केशवराव धोंडगे यांनी मोठे प्रयत्न केले. गोसंवर्धन केंद्रामुळे लालकंधारी पशुधनाची वाढ व विकास व्हावा, दुग्धक्रांतीला चालना मिळेल, यासाठी प्रयत्न झाले. त्याला अद्याप मुर्तरुप आले नाही. परंतु केंद्रात अंशकालीन स्वच्छकपदावर १९८८ पासून फक्त ८ रुपये मानधनावर नामदेव भंडारे यांनी भविष्यात मोठा फायदा होईल या आशेने कामास प्रारंभ केला.अल्प मानधनामुळे संसाराचा गाडा हाकने कठीण झाले आहे. यामुळे वरिष्ठांकडे अर्ज-विनंत्या करण्यात आल्या. यामुळे १४० रुपये मानधन सुरु झाले. आता १८०० रुपये आहे. अन्नधान्य, भाजीपाला, खाद्यतेल, शिक्षण आदींचा खर्च हा आवाक्याबाहेर झाला आहे. टिचभर पोटाची खळगी भरावी की शिक्षणाचा खर्च करावा, अशा विचित्र कात्रीत कुटुंबाची फरफट सुरु झाली आहे. त्यामुळे परिचर पदावर कायम करण्यासाठी विनंती अर्ज सुरु झाले. परंतु याकडे अद्याप वरिष्ठ पातळीवरुन विशेष लक्ष दिले ानही. सेवेत कायम असणाऱ्या सामान्य कर्मचाऱ्यांना वेतन आयोग, वार्षिक वेतनवाढ, नोकरीतील सर्व फायदे मिळतात. त्यामुळे आपल्या मुलाला डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनिअर, जिल्हाधिकारी करण्यासाठी धडपडत असतात. उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील असतात. याउलट अल्प मानधनावर कोणते स्वप्न उरी बाळगावे, असा प्रश्न त्यांना पडतो. परिचर पदावर कायम करण्यात आले असते तर इतर कर्मचाऱ्याप्रमाणे शासकीय सोयी-सुविधा मिळाल्या असत्या. परंतु घोडे नेमके कुठे अडले हा प्रश्न आहे.
अडीच दशकांचा जगण्यासाठीचा संघर्ष
By admin | Updated: August 18, 2014 00:34 IST